प्रशांत जगतापांचा राजीनामा अन् अजितदादांशी युती; सुप्रिया सुळेंनी दिली A टू Z माहिती

Supriya Sule On Prashant Jagtap : पुणे महानगर पालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र

Supriya Sule On Prashant Jagtap

Supriya Sule On Prashant Jagtap

Supriya Sule On Prashant Jagtap : पुणे महानगर पालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप नाराज असून लवकरच शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर राजीनाम्यावर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांच्याकडून देण्यात आली होती.

तर आता पत्रकार परिषद घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. गेल्या 48 तासांत माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही असं या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे आता प्रशांत जगताप यांची नाराजी दुर झाली का? आणि जगताप शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडणार का? याबाबत सध्या पुण्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, प्रशांत जगतापांसोबत (Prashant Jagtap) सविस्त चर्चा झाली असून कार्यकर्त्यांशी बोलून अजित पवारांशी युतीबाबत निर्णय घेणार आहे. तसेच युतीसंदर्भात माझी आणि अजित पवारांची भेट झाली नाही. शरद पवार जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तर दुसरीकडे गेल्या 48 तासांत माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही असं देखील सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या. तसेच 29 महानगरपालिका निवडणुकीत शक्य असेल तिथे महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.

6,6,6,6…, विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची वादळी खेळी; पहिल्याच सामन्यात झळकावले शतक

तर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्याने मला आनंद आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तर मुंबईत महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. मी यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच आम्ही जागावाटपावर घोषणा करणार आहे.

Exit mobile version