Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राजकीय तसेच पुण्यातील स्थानिक प्रश्नांवर देखील चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी पुण्यातील बांधकामं तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी दोन कारणं सांगितली आहेत.
‘या’ कारणामुळे पुण्यातील बांधकामं तात्काळ थांबवा…
मी दीड दोन महिन्यांनी पुण्याला येत असते. तेव्हा प्रत्येक वेळी नवीन बांधकामं सुरू असतात. पण ही बांधकाम शहरातील नागरिकांसाठी धोकादायक आहे. कारण एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शेतीच पाणी, सांडपाणी यांचाही प्रश्न गंभीर होत चालाल आहे. मात्र त्यात दुसरीकडे शहरात सर्रास बांधकामं केली जात आहेत. त्याला प्रचंड प्रमाणात पाणी वापरलं जात आहे.
‘जरा संयम बाळगा… ओबीसींचे आंदोलन उभं करणं योग्य नाही’; विखेंनी भुजबळ-जरांगेंना फटकारले
तसेच एकीकडे आहे त्याच नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास शहरात मर्यादा येत असताना, आणखी लोकसंख्या वाढल्यास त्यांच्यासाठी पाणीव्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट यांसह पायाभूत सुविधा कशा देणार? हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने पाण्याचं व्यवस्थापन करावं अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.
Nana Patole : ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची भूमिका काय? नाना पटोलेंनी सांगून टाकलं
त्याचबरोबर त्यांनी यावेळी पुणे शहरातील बांधकामं तात्काळ थांबवण्यात यावीत अशी मागणी केली. याला त्यांना दोन कारण सांगितली त्यात पहिलं म्हणजे पाण्याची टंचाई तसेच सध्या वाढत असलेले प्रदुषण कारण इमारतींच्या बांधकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढते. त्यातून प्रदुषण आणखी वाढते. त्यामुळे पुणे शहरातील बांधकामं तात्काळ थांबवण्यात यावीत अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी महानगर पालिकेवर प्रशासन राज असल्याने शहरात नगरसेवक नाहीत. त्यामुळे गैरसोय होत आहे. फिल्डवरचे लोक नसल्याने ग्रामीण भागात अडचणी येत आहेत. पुणे पालिकेकडून देखील ते कबूल करण्यात येत आहे. की शहरात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.