Download App

अनु पांडे ‘एसोएफ बेस्ट इंटरनॅशनल टीचर पुरस्काराने सन्मानीत; शैक्षणिक कार्याची दखल..

शिक्षिका अनु पांडे यांना ‘एसोएफ बेस्ट इंटरनॅशनल टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.

Pune News : गणित आणि विज्ञान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन (एसओएफ) द्वारे नांदे स्थित (Pune News) ध्रुव ग्लोबल स्कूलची शिक्षिका अनु पांडे यांना ‘एसोएफ बेस्ट इंटरनॅशनल टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे पुरस्कार पांडे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि प्रशंसापत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

शिक्षकांना त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी, विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी संस्थेमार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. शिक्षणात उल्लेखनीय योगदान देण्यासाठी सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन (एसओएफ) कडून दिला जाणारा एक प्रतिष्ठित सन्मान आहे. हा पुरस्कार विशेषतः विज्ञान आणि गणित क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या शिक्षकांना दिला जातो.

राजश्री एंटरटेन्मेंटच्या ‘पाणी’ ने 25 पुरस्कारांवर उमटवली मोहोर; ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट

अनु पांडे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडून शिक्षणेची गुणवत्ता सुधारली आहे. नेतृत्वगुण प्रदर्शित करून शिक्षणात नावीन्यपूर्णता आणि दूरदृष्टी दाखवली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या उत्कृष्टतेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी, मुख्याध्यापिका संगीता राऊतजी व संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

follow us