Download App

Ajit Pawar On Budget : ‘केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला’

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन (Union Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केल्याचं दिसून आलंय. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’ (Election jumla)असल्याची टीका अजित पवार यांनी केलीय. पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारनं आगामी नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केल्याचं म्हटलंय. आगामी काळात कर्नाटकच्या (Karnataka)निवडणुका आहेत, तिथं साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. कर्नाटकला लागूनच महाराष्ट्र (Maharashtra)आहे. मग महाराष्ट्रालाही तेवढेच पैसे द्यायला पाहिजे होते.

केंद्र सरकारला महाराष्ट्रातून सर्वात जास्त पैसा मिळतो, अशावेळी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिकचे पैसे द्यायला पाहिजे. मुंबईत अनेक प्रश्न आहेत. मेट्रो, वाहतूक, झोपडपट्टी असे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात महाराष्ट्राच्या हिताची कोणतीही घोषणा झाली नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेचं अजित पवार यांनी कौतुकही केलंय. केंद्र सरकारनं मागे जाहीर केलं होतं. शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याविषयी अधिकचा भाव दिला असताना त्याला आयकर लावला होता. ही कर लावू नये अशी मागणी होती. अनेक वर्ष हे प्रकरण चालू होतं. या अर्थसंकल्पानंतर हे प्रकरण निकाली निघालंय. या गोष्टीचं समाधान असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलंय.

follow us