पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात स्टेटस्को; धर्मादाय आयुक्तांनी असा निर्णय का घेतला?

या प्रकरणात ॲड. योगेश पांडे यांनी कायदेशीर बाजू मांडली. या सुनावणीसाठी जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी जैन बांधव उपस्थित होते.

News Photo (16)

News Photo (16)

पुण्यात जैन बोर्डिंग हाऊसचा विषच तापलेला असतानाचा आता या विषयात धर्मादाय आयुक्तांनी एक महत्वाचा आदेश दिला आहे. पुणे शिवाजीनगर येथे ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊस आहे. या हाऊसच्या जागा विक्रीविरोधात एक जनआंदोलन उभं राहिलं होतं. जैन समाजाच्या भावना, रोष लक्षात घेऊन पुणे जैन बोर्डिंग हाऊस विषयात धर्मादाय आयुक्तांनी स्टेटस्को दिला आहे. म्हणजे परिस्थिती जैसे थे राहणार आहे. आज मुंबईत धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांच्याकडे एचएनडी जैन बोर्डिंग संदर्भातील अती तातडीची सुनावणी पार पडली.

या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी कायदेशीर बाजू मांडली. या सुनावणीसाठी जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन तसेच इतर जैन बांधव उपस्थित होते. जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील लढ्याचा आज पहिला टप्पा होता. स्टेटस्को म्हणजे परिस्थिती जैसे थे ठेवण्याच्या निर्णयामुळे आता ही जागा विकता येणार नाही. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या या जागेवर 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी वसतिगृहाची उभारणी केली होती. विश्वस्तांना या जागेवर विकासकामार्फत विकास करायचा होता. परंतु, समाजातील काही लोकांचा याला विरोध होता. काही दिवसांपूर्वी या जागेची परस्पर विक्री केल्याचा आरोप झाला. त्यानंतर एक जनआंदोलन उभं राहिलं.

पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी व्यवहाराला मंजुरी देताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप झाला. या प्रकरणात राजकीय नेत्यांवरही मोठ्या प्रमाणात आरोप झाले. अहिंसा परमो धर्म. जैन समाज सर्वच कार्यात पुढे असतो. देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतले आणि भावना ऐकल्या. जैन समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस हे जैन समाजासोबत राहिले. यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याशी, पक्षाशी संबंध नाही. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. बोर्डिंग वाचली पाहिजे, मंदिर वाचलं पाहिजे आणि जैन समाजाची जागा त्यांचीच राहिली पाहिजे. इतकीच मागणी आहे” असं सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खबिया यांनी सांगितलं.

Exit mobile version