Puneet Balan Group : सिंहगडावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने आलेल्या एका तरुणीला ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’कडून नेमण्यात आलेल्या पहारेकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश मिळालं. संबधित तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ते पुढील तपास करत आहेत.
‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’ यांच्या माध्यमातून सिंहगडासह काही महत्वाच्या ठिकाणांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारी (दि. ९ ऑक्टोबर) दुपारी हे कर्मचारी सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचं या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. या कर्मचाऱ्यांनी तरुणीला विचारणा केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरं देत ती कल्याण दरवाजाच्या दिशेने निघून गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं, त्यांनी तत्काळ गडावरील ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ व इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन या तरुणीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं.
मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचं नाही; आईने आवाज ऐकला नाही, मुलाची अनाथाश्रमात आत्महत्या
दरम्यान, ही तरुणी एका बुरूज आणि दरीच्या ठिकाणी उभी राहून खूप वेळ मोबाईलवर बोलत रडत उभी होती. कुठल्याही क्षणी ती दरीत उडी मारू शकते अशी परिस्थिती होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावध राखून दिलेल्या माहितीमुळे वन विभाग आणि पोलीस पाटील जागेवर पोहचले. त्यांनी या तरुणीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांकडून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र, ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’च्या पहारेकरी कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तरुणीला वाचवता आलं. त्यामुळे गडावरील नागरिकांनी त्यांचे कौतुक केलं आहे.
सिंहगडावरील स्वच्छता आणि सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून त्या तरुणीला वाचवलं. ज्या उद्देशाने आम्ही ऐतिहासिक ठिकाणी कर्मचारी नेमले आहे, तो उद्देश साध्य होत आहे. कर्मचाऱ्यांनी केलेलं काम निश्चितच कौतुकास्पद आहे. एका तरुणीचे प्राण त्यांनी वाचवल्याने मी या कर्मचाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांच्या सतर्कतेला सलाम करतो आणि त्यांचे आभारही मानतो अशी भावना पुनीत बालन ग्रुपचे प्रमुख पुनीत बालन यांनी व्यक्त केली.