Download App

काळजी घ्या! पुण्यात कोरोना पेशंट्सचा आकडा वाढला

  • Written By: Last Updated:

गेल्या काही महिन्यांपूर्वी देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. त्यामुळं नागरिक निर्धास्त होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं (Corona) थैमान घालायला सुरूवात केली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही आहे. पुण्यात देखील मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

पुण्यात आजमितीला एकूण 406 कोरोनाचे पेशंट्स असून त्यापैकी 30 जणांवर विविध खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या हॉस्पिटलाईज पेशंट्स पैकी 3 जण व्हेंटिलेटरवर तर 8 जण ऑक्सीजन वर आहेत.

https://letsupp.com/maharashtra/western-maharashtra/and-the-leader-of-ncp-filled-ajit-pawar-33204.html

राज्याची परिस्थिती काय?

तर याबरोबर राज्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4587 इतकी आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत आहेत.

मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या एक हजार 434 इतरी आहे. त्यानंतर ठाण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 820 इतकी आहे. तर रायगडमध्ये 251 सक्रीय रुग्ण आहेत. परभणीमध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही, राज्यातील तो एकमेव जिल्हा आहे.

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक : राहुल गांधी प्रकरणावरुन मांडणार… 

देशभरात गेल्या आठवड्यात झालेल्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने COVID-19 साठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. घाबरु नका, खबरदारी बाळगा, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पहाता मास्क वारा, असं यात सांगितलं आहे. शिवाय, श्वास घेण्यात अडचण आल्यास, उच्च दर्जाचा ताप/गंभीर खोकला, विशेषत: 5 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी, असं मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगण्यात आलं.

Tags

follow us