Download App

Amol Kolhe : मी स्टार प्रचारक, हे आत्ताच कळलं

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नाराज असल्याची चर्चा आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात (Kasba and Chinchwad by-elections) अमोल कोल्हे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘मी स्टार प्रचारक आहे, हे मला आत्ताच कळलं’, असे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असतानाच चिंचवडमध्येही चुरस निर्माण झाली आहे. त्यातच या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अमोल कोल्हे पोटनिवडणुकीबाबत म्हणाले की, या सगळ्या गोष्टी सुरू असताना मी दिल्लीत होतो. राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य आहे. अजित पवार आणि इतर नेत्यांनी निर्णय घेतल्यावर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय बोलणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान कसबा, चिंचवडमध्ये सभा घेण्याबाबत मला माहिती नाही. मी स्टार प्रचारक आहे, हे मला आत्ताच कळलं, अस कोल्हे म्हणाले. तसेच भाजप प्रवेशाबाबत कोल्हे म्हणाले की, लोकशाहीतमध्ये राजकारणाचा पोत बदलत चालला आहे. संसदेतील भाषणाबाबत अजूनही लोकांना प्रश्न पडत असेल तर माझे संसदेतील पूर्ण भाषण ऐकावे. माझ्या संसदेच्या भाषणात “कभी खुशी कभी गम” आहे का, हे तुम्हाला कळेल, असंही कोल्हे यांनी नमूद केलं.

Tags

follow us