मोठी घडामोड! पिंपरी-चिंचवड पालिकेत नवा ट्विस्ट; उपमहापौरपदी शिंदे नाही तर… नेमकं काय घडलं?

पिंपरी चिंचवडच्या राजकारणात धक्कादायक ट्विस्ट! उपमहापौरपदासाठी नावाची घोषणा झाली, नाव ऐकून क्षणात उमेदवाराने महापालिका भवन सोडले.

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024

Twist In PCMC Deputy Mayor Selection : पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली आहे.  भाजपचा दुसऱ्या टर्म मधील पहिला महापौर होण्याचा मान रवी लांडगे यांना देण्यात आला आहे. मात्र, आता उपमहापैरपदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट आला असून, भाजपचे निष्ठावान शीतल शिंदे यांच्याऐवजी शर्मिला बाबर यांनी तर, राष्ट्रवादीकडून वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता शर्मिला बाबर की, काळभोर यापैकी कुणाची वर्णी लागते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नेमकं पिंपरी पालिकेत काय घडलं ते जाणून घेऊया..

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर कोणीही बालू नये; केवळ तीन नेत्यांवरच जबाबदारी, शरद पवारांच्या पक्षाकडून स्पष्ट आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवले. त्यानंतर आता महापौर- उपमहापौर कोण होणार? याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर भाजपाच्या प्रदेश नेतृत्त्वाने महापौरपदासाठी भोसरीतील बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर, उपमहापौर पदी भाजपचे निष्ठावान शीतल शिंदे यांची निवड झाली होती. पण, उपमहापौर पदी निवड झालेल्या विजय उर्फ शीतल शिंदे यांनी पद स्वीकारण्यास नकार देत थेट बाहेरचा रस्ता पकडला त्यामुळे त्यांच्या जागी आता भाजपकडून शर्मिला बाबर तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला आहे.

शितल उर्फ विजय शिंदे नाराज अर्ज न भरताच पालिकेतून निघून गेले

महापौर पदासाठी तीव्र इच्छूक असणारे निष्ठावंत शीतल शिंदेंना डावलत त्यांना उपमहापौर पद देण्यात आले होते. यामुळे नाराज झालेले शिंदे पालिकेतून अर्ज न भरताच तडकाफडकी निघून गेले. शीतल शिंदे हे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून, पालिकेत भाजपचे केवळ तीन नगरसेवक होते, तेव्हापासून शिंदे हे नगरसेवक राहिले आहेत. मात्र 2017 ते 2022 दरम्यान त्यांना एकही पद पदरी न पडलेल्या शिंदेंना यावेळी पक्ष न्याय देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापौर पद न देता त्यांना उपमहापौर पद देण्यात आलं. त्यामुळे शिंदे यांनी अर्ज न भरण्याची भूमिका घेत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

तू पक्षाचा शहराध्यक्ष जरी असलास तरी माझा…; साथ सोडलेले प्रशांत जगताप पुन्हा दादांसमोर नतमस्तक

महापौरपदी निवड झालेले रवि लांडगे किती तगडे?

रवि बाबासाहेब लांडगे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिवंगत माजी विरोधी पक्षनेते हे बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव आहेत आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक अंकुशराव लांडगे यांचे पुतणे असून, त्यांनी डी. फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर नजर टाकल्यास त्यांनी पिंपरी-चिंचवड भाजपचे युवा मोर्चा सरचिटणीस तसेच 2017 ते 2022 मध्ये माजी विरोधी पक्षनेते पद भूषविले आहे.

 

Exit mobile version