Pune News : बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणाऱ्या अनेक लोकांना आतापर्यंत एटीएसने (ATS) ताब्यात घेतलं. दरम्यान, आज पुणे ग्रामीणमधील ओतूर हद्दीत वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी युवकांना एटीएसने ताब्यात घेतलंय. हे तरुण २५ ते ३० वर्ष वयोगटातील असून त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड,(Fake Aadhaar Card), पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असल्याचे आढळून आलंय. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण…
ताजमीर मोश्ताफा अन्सारी वय – 29 वर्ष, यास ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे विचारपूस करून त्याचा बांगलादेशी मित्र मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय 28 वर्ष) यालाही ताब्यात घेतलं. हे दोघेही (मूळ रा. बोकराई, जिल्हा शारखीरा, बांगलादेश) इथले रहिवासी आहेत. त्यांच्याकडून भारतीय बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मोबाईल हँडसेट आणि दोघांचे व्हिसा संपलेले बांगलादेशी पासपोर्ट जप्त केले आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवणार, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकची भारताला धमकी
तपासात असे दिसून आले की, हे तरुण बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले होते. स्थानिक व्यवहारांसाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी बनावट आधार, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर केला असण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई API दत्तात्रय दराडे, HC शरद जाधव आणि PC तांदळवाडे यांनी ओतूर पोलीस स्टेशन मार्फत केली. दरम्यान, एटीएसने स्थानिक नागरिकांना संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केलं.