Uday Samant On Sachin Sanap : सचिन सानप कोण हे 27 तारखेला महाराष्ट्राला कळेल

Uday Samant On Sachin Sanap : आजपर्यंतच्या इतिहासात पुणे शिक्षक मतदार संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षक मतदार संघाला पुण्याचा

Uday Samant On Sachin Sanap

Uday Samant On Sachin Sanap

Uday Samant On Sachin Sanap : आजपर्यंतच्या इतिहासात पुणे शिक्षक मतदार संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षक मतदार संघाला पुण्याचा प्रतिनिधी मिळाला नाही. पुणेकरांबरोबरच कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील शिक्षक मतदार यांनी ‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच असला पाहिजे’ अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. त्यामुळे सचिन सानप कोण? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यक्तींना येत्या २७ ऑक्टोबर रोजी सचिन सानप कोण हे समजेल, शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या. त्यापूर्वी दुपारी सामंत यांनी सचिन सानप (Sachin Sanap) यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी सामंत बोलत होते. यावेळी पुण्याचे शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप, मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.

सामंत (Uday Samant) म्हणाले, पुणे शिक्षक मतदार संघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे.शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार पाठिंबा देतील, असे भाजपचे नेते प्रचार करत आहेत. तो त्यांच्या प्रचाराचा भाग आहे. सानप हे पाचही जिल्ह्यात शिक्षकांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी ठरवले आहे. कोणाला आमदार करायचे?

23 ऑक्टोबरला तब्बल 14 सिनेमे प्रदर्शित होणार; हिंदी-मराठी चित्रपटांसह OTT वरही नव्या सिरीजची मेजवानी-

Exit mobile version