पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा आहे. ७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त या निर्णयाचे स्वागत आहे. महागाईच्या काळात हा निर्णय गरजेचा हाेता. महागाईचा वाढता आलेख हा दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये कामगार वर्गाचा विचार केला गेला याचे समाधान व्यक्त करण्यापलीकडे दुसरं काहीच नाही. तर जनतेचे पगार आहे त्याच ठिकाणीच आहे. त्याबद्दल काहीच नाही, अशी प्रतिक्रिया संस्कार भारतीचे सहसंयाेजक सचिन तळे (Sachin Tale) यांनी व्यक्त केली.
तर ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष अली दारुवाला म्हणतात का, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमृत युगातील पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेनुसार अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा दिला आहे. तंत्रज्ञान, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक समृद्धीकडे नेणारा आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी आणि युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रांची वाढ हे सर्वात महत्त्वाचे निर्णय आहेत. कौशल्य विकासांतर्गत ४७ लाख तरुणांना स्टायपेंड देण्यात येणार आहे, जेणेकरून युवक सक्षम आणि स्वावलंबी होतील.