Download App

पुण्यात चाललंय तरी काय? केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण, तिघांना अटक

Muralidhar Mohol : गेल्या काहीदिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच पुण्यात (Pune) आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

  • Written By: Last Updated:

Muralidhar Mohol : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच पुण्यात (Pune) आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कायदा- सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. माहितीनुसार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणाला मारणे टोळीकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. कोथरूडमध्ये (Kothrud) ही घटना घडली आहे.

माहितीनुसार,  या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. देवेंद्र पुरुषोत्तम जोग असं मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तीन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे.  बाब्या उर्फ श्रीकांत पवार असे फरार आरोपीचं नाव आहे. एकमेकांकडे बघितल्यावरुन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडीओ काँलवर करून मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाची चौकशी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वैयक्तिक कामानिमित्त दुचाकीवरून भेलकेनगर परिसरात गेला होता. तेथील काम करून तो पुन्हा घराकडे चालला असताना, भेलकेनगर चौकातून ‘मारणे टोळी’तील काही व्यक्तींनी काढलेली मिरवणूक सुरू होती.

महिलांना 50 टक्के सवलत अन् ज्येष्ठांना मोफत बस सेवा दिल्याने ST तोट्यात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची कबुली

या मिरवणुकीत मारणे टोळीचा प्रमुखही उपस्थित होता. तरुण मिरवणुकीच्या समोरून दुचाकी घेऊन पुढे गेला. त्याचा राग आल्याने तीन ते चार जणांनी पळत जाऊन तक्रारदाराला थांबवले आणि शिवीगाळ केली. ‘गाडी हळू चालवता येत नाही का, धक्का का दिला,’ असे म्हणून टोळक्याने तरुणाला मारहाण केली.

follow us