UPSC 2022 Result : यूपीएससीमध्ये सारथीचा ‘डंका’, तब्बल सतरा जणांनी मारली बाजी

UPSC 2022 Result : यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्राच्या विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आले आहेत. सरकारच्या सारथी संस्थेमार्फत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)च्या तब्बल 17 विद्यार्थी यूपीएससीच्या अंतिम यादीत आले आहे. Ishita Kishor : दमेपर्यंत खेळली, मान मोडेपर्यंत अभ्यास केला […]

Upsc Logo

Upsc Logo

UPSC 2022 Result : यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्राच्या विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आले आहेत. सरकारच्या सारथी संस्थेमार्फत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)च्या तब्बल 17 विद्यार्थी यूपीएससीच्या अंतिम यादीत आले आहे.

Ishita Kishor : दमेपर्यंत खेळली, मान मोडेपर्यंत अभ्यास केला पण शिस्त नाही सोडली; UPSC टॉपरच्या यशाचे रहस्य

यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी मार्फत आर्थिक मदत करण्यात येते. यूपीएससीच्या 2022 या वर्षात मुख्य पीक्षा व मुलाखतीकरिता ३९ विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले होते. त्यातील तब्बल सतरा विद्यार्थी हे मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत. त्यांचे रॅंकही चांगले आहेत. यात पाच विद्यार्थी हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पुणे, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, धाराशिव येथील विद्यार्थीही यशस्वी ठरले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील मंगेश पिराजी खिलारी, सागर यशवंत खर्डे, राजश्री शांताराम देशमुख, महारुद्र जगन्नाथ भोर हे पाच विद्यार्थी केंद्रीय सेवेत अधिकारी होणार आहे.

IPS अधिकाऱ्याच्या कारला अभिनेत्रीची जाणूनबुजून टक्कर? गुन्हा दाखल झाल्यानंतरचं ट्विट चर्चेत

यशस्वी ठरलेले इतर जिल्ह्यातील विद्यार्थी-जरड प्रतिक अनिल (पुणे), ऋषिकेश हनमंत शिंदे (सांगली), अर्पिता अशोक ठुबे (ठाणे), सोहम सुनील मांढरे (पुणे), आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), शशिकांत दत्तात्रय नरवाडे (धाराशिव), स्वप्नील चंद्रकांत बागल (हिंगोली), लोकेश मनोहर पाटील (जळगाव), प्रतीक्षा संजय कदम (सातारा), मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), करण नरेंद्र मोरे (सातारा),शिवम सुनिल बुरघाटे, शिवहार चक्रधर मोरे (नांदेड).

Exit mobile version