भलताच प्रकार! फरार निलेश चव्हाणची खोटी माहिती देऊन पोलिसांनाच बनवलं; फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

बक्षीस मिळण्याच्या नादात पोलिसांना निलेश चव्हाणची खोटी माहिती दिली म्हणून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.

Nilesh Chavan

Nilesh Chavan

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलीस (Vaishnavi Hagawane) निलेश चव्हाणचा शोध घेत आहेत. निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. वैष्णवी हगवणेच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आणखी एक गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. पण, तो काही अजून हाती आलेला नाही. इकडे मात्र दुसराच प्रकार घडला आहे. बक्षीस मिळण्याच्या नादात पोलिसांना निलेश चव्हाणची खोटी माहिती दिली म्हणून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. फरार चव्हाणला पकडून ठेवल्याची खोटी माहिती दिली म्हणून नांदेड सिटी पोलिसांनी संतोष दत्तात्रय गायकवाड या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, “फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय” असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. परंतु, येथे पोलिसांना निलेश चव्हाण कुठेच दिसला नाही. फोन करुन खोटी माहिती दिली गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिल्यावर पोलिसांकडून बक्षिसाची रक्कम मिळेल. या हेतूने ११२ या क्रमांकावर संतोष गायकवाडने फोन केला.

फोन करणाऱ्यांनी ‘आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण हा पकडून ठेवला आहे. त्याच्या जवळ दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करून गाडीचे डिक्कीत ठेवले आहे.’ असे सांगितल्याने त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली. तो व्यक्ती किरकटवाडी येथील पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल येथे मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली. त्या व्यक्तीने खोटे कॉल करत असल्याचे आढळून आले.

विश्वास टाकला, पण दहा कोटींना चुना लावला ! दोघांनी मालकाचा ‘असा’ घात केला ?

निलेश चव्हाणचा इतिहास पत्नीच्या छळाचा..

निलेशचा आणि त्याचा वडिलांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्याकडे आर्थिक सधानता आलीय. त्याच्या पत्नीचा सातत्याने छळ होत राहिला. शेवटी कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये तिने वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मारहाण अन् व्हिडिओ संदर्भात सर्व माहिती सविस्तर दिली. परंतु त्या काळातील वारजे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. कारण त्यांनी निलेशला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली होती. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा तो अर्ज फेटाळला. तरी देखील निलेश चव्हाण याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता.

या सर्व घटनेनंतर निलेश चव्हाण विभक्त झाला. त्याचा आणि हगवणे कुटुंबांचा घरोबा होता. तो शशांक हगवणे आणि त्याची बहिण यांचा तो मित्र होता. अनेकदा जेव्हा कस्पटेंनी बोलणी केली, तेव्हा ती निलेश चव्हाणच्याच ऑफिसमध्ये झाली. त्यानंतर वैष्णवीच्या मृत्यूनंतर ते बाळ हगवणे कुटुंबांने निलेश चव्हाणकडे दिले होते. बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला म्हणून निलेश चव्हाणवर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवी हगवणेचं चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचं जुनं प्रकरण उघड; ‘या’ प्रकरणात 3 वर्षांपूर्वीच गुन्हा

Exit mobile version