Jagdish Mulik Name In List For Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 6 जागा येणार आहे. विशेष म्हणजे, या यादीत पुण्याचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
GOLD प्रचंड स्वस्त होणार! RBI चे भल्या मोठ्या दोन पानी रिपोर्टमध्ये संकेत; अनेकांच्या पोटात गोळा…
पुण्यातील संघटन कौशल्याचे मिळणार फळ?
भाजपच्या कोअर कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार, यावेळी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांऐवजी ‘संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना’ संधी देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. जगदीश मुळीक यांनी पुणे शहराध्यक्ष म्हणून केलेल्या कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. मुळीक यांनी पुण्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावली होती, त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकांच्यावेळी मुळीक यांनी माघार घेतली होती. यावेळी फडणवीसांनी या माघारीची योग्यवेळी दखल घेतली जाईल असा शब्द दिला होता. त्यानंतर आता मुळीक यांचं नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आले आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी आणि जातीय समीकरणे
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने यावेळी प्रस्थापित बड्या नेत्यांपेक्षा अशा चेहऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे जे लोकांमध्ये सक्रिय आहेत आणि ज्यांच्यामुळे पक्षाची जातीय समीकरणे अधिक मजबूत होतील. 30 जणांच्या यादीत जगदीश मुळीक यांचे नाव आघाडीवर असल्याने, पुणे जिल्ह्यातून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
काँग्रेसने भाकरी फिरवत पुणे जिल्ह्याचे केले दोन भाग; हायकमांडच्या आदेशामुळे दिग्गजांचे टेन्शन वाढले
कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?
पक्षाने ठरवलेल्या ३० जणांच्या यादीत मुळीक यांचं नाव देखील असल्याची सूत्रांची माहिती आहे.. राज्य युनिटने सुचवलेल्या नावांपैकी 6 पैकी 3 नावे निवडली जाऊ शकतात. मात्र, जगदीश मुळीक यांनी संघटनात्मक पातळीवर केलेले कार्य आणि त्यांची पुण्यातील पकड पाहता, त्यांचे नाव या शर्यतीत प्रबळ मानले जात आहे.
इतर प्रमुख दावेदार
मुळीक यांच्यासोबतच यादीत माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, केशव उपाध्ये, राम सातपुते आणि राजेश पांडे यांसारख्या संघटनात्मक नेत्यांचीही नावे आहेत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषतः पुण्याच्या राजकीय वर्तुळात आता जगदीश मुळीक यांच्या नावावर कधी शिक्कामोर्तब होते, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
