Vidhansabha Election : विजयी भव ! राहुल कलाटेंना जैन मुनींनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा…

आज वाकड येथील पिंक सिटी रस्त्यावरील १००८ महाविर जिनालय या जैन श्रावक स्थानकाला राहुल कलाटेंनी भेट दिली.

Rahul Kalate

Rahul Kalate

Chinchwad Assembly Constituency: चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे (Chinchwad Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस राहिलेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांच्या भेटीगाठी कलाटेंकडून सुरू आहेत. दरम्यान, आज वाकड येथील पिंक सिटी रस्त्यावरील १००८ महाविर जिनालय या जैन श्रावक स्थानकाला राहुल कलाटेंनी भेट दिली.

चिंचवडमध्ये परिवर्तन निश्चित; राहुल कलाटे आमदार होणार : खासदार संजय राऊत 

जैन श्रावक स्थानकाला भेट देत कलाटे यांनी महावीर स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी स्थानाकातील जैन मुनिंनी विजयासाठी आशीर्वाद शुभेच्छा दिल्या. यावेळी जैन साधक आणि इतर बांधवांशी विविध विषयावर राहुल कलाटे यांनी चर्चा केली. यावेळी कलाटे यांचा स्थानकाच्या वतीने यथोचित सन्मान झाला. यावेळी स्थानकाचे अध्यक्ष सोनल जैन, सुकमाल जैन, रिचा जैन यांच्यासह परिसरातील विविध संसदेचे पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Assembly Election: इव्हीएमची माहिती प्रशासनाकडून मिळेना; राहुल कलाटे यांची थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार 

राहुलदादा आमदार होणारच…
दरम्यान, आज कलाटे यांनी थेरगावात परिवर्तन पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत अबाल वृद्ध, नागरिक, महिला आणि युवकांनी जोरदार गर्दी केली होती. थेरगाव परिसरात कलाटे यांचे आगमन होताच हलगी तुतारीच्या कडाडणाऱ्या आवाजात, फटाक्यांची आतिषबाजी अन् जागोजागी फुलांची पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले.
यंदा आमचं ठरलंय- वार फिरलंय, परिवर्तन घडणारच, राहुलदादा आमदार होणारच या घोषणांनी थेरगाव परिसर अक्षरशः दुमदमला.

Exit mobile version