Vijay Shivtare यांचे आरोप : सुप्रिया सुळे म्हणाल्या की…?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)या पुणे दौऱ्यावर असताना शनिवारी मटण खाल्ल्यानंतर महादेवाच्या मंदिरात गेल्याचा आरोप शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला होता. शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर काही लोकांनी टीका केली. हिंदू महासंघानेही त्यात उडी घेऊन सुळे यांच्यावर टीका केली. यावर स्पष्टीकरण देताना सुप्रिया […]

Vijay Shivtare Supriya Sule

Vijay Shivtare Supriya Sule

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)या पुणे दौऱ्यावर असताना शनिवारी मटण खाल्ल्यानंतर महादेवाच्या मंदिरात गेल्याचा आरोप शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला होता. शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर काही लोकांनी टीका केली. हिंदू महासंघानेही त्यात उडी घेऊन सुळे यांच्यावर टीका केली. यावर स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाने खुलासा केला आहे की, सुप्रिया सुळे या मटण खाऊन मंदिरात गेल्या नाही. तर एका खासगी हॉटेलच्या उदघाटनाला गेल्या होत्या. तिथे त्यांनी मटण खाल्ले नाही. तर केवळ उदघाटन केले आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.

‘…आणि म्हणून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला’; धंगेकरांनी सांगितलं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं कारण

शिवेसेनेचे नेते यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळे या मटण खाऊन भैरवनाथ मंदिरात गेल्या असा दावा केला आहे. त्यावर बरीच चर्चा होत असून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

शरद पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांनी हिंदू धर्म शिकून घ्यावा. मंदिरात जाण्याआधी मांसाहार करू नये किंवा मांसाहार करून मंदिरात जाऊ नये, ही शरद पवार यांनी पाळलेली ही तत्वे सुप्रिया सुळे यांनी पाळणे गरजेचे आहे. इतका पुरोगामीपणा बरा नाही, असा टोला आनंद दवे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण मांसाहार केला म्हणून पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जाणार नाही असे सांगितले होते. मात्र, त्यांचीच कन्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यात मटण खाऊन महादेवाच्या दर्शनाला गेल्याचे सांगितले जात आहे. हे खरं असेल तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद आहे, असे मला वाटते.

Exit mobile version