पुण्यात शिकणाऱ्या गरजू-गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणार विनायकी – विनायक निम्हण शिष्यवृत्ती

Vinayaki - Vinayak Nimhan Scholarship : कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक

Vinayaki   Vinayak Nimhan Scholarship

Vinayaki Vinayak Nimhan Scholarship

Vinayaki – Vinayak Nimhan Scholarship : कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक (आबा) निम्हण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ’विनायकी – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ (Vinayaki – Vinayak Nimhan Scholarship) देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती (Scholarship) वाटपाचा हा समारोह 5 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन नाव नोंदणी करावी, अशी माहिती सनी विनायक निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेला सनी विनायक निम्हण (Sunny Vinayak Nimhan) यांच्यासह उमेश वाघ, बिपीन मोदी,येवल्याचे मा.नगराध्यक्ष निलेश पटेल,वेदांत बांदल हे उपस्थित होते. सनी निम्हण पुढे म्हणाले की, जगात कोणीही शिक्षण आणि आरोग्यापासून वंचित राहू नये असे नेहमीच कार्यसम्राट मा. आ. विनायक (आबा) निम्हण म्हणायचे. तसेच ते त्यादृष्टीने सातत्याने कार्य देखील करायचे. त्यांच्या कार्याचा वसा पुढे घेऊन जात सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिर तसेच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून विनायकी शिष्यवृत्ती उपक्रम राबवत आहोत.

शिष्यवृत्तीचे हे तिसरे वर्ष असून, प्रथम वर्षी 396 विद्यार्थ्यांना व दुसऱ्या वर्षी 500 हून अधिक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाचवी आणि आठवीच्या ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थोड्या मार्कांनी हुकलेली आहे त्यांना देखील प्रोत्साहनपर या उपक्रमात शिष्यवृत्ती दिली जाईल. गरीब घरातील अनेक होतकरू मुला-मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा असते. परंतु परिस्थितीमुळे त्यांना बऱ्याचदा ते शक्य होत नाही. अशा वेळेस त्यांची फार कोंडी होते. त्यामुळे पुणे शहरातील अशा गरीब व होतकरू मुला-मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, ’विनायकी – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ घेण्यासाठी पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 7 जुलै ते 20 जुलै दरम्यान ऑनलाईन नोंदणी करावी. अर्जांमधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची 26 व 27 जुलै रोजी सोमेश्वर फाउंडेशनचे कार्यालय, शैलजा हॉटेल लेन, जंगली महाराज रोड, पुणे येथे प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना 5 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल.

इंग्रजांनी आपल्या नायकांचा इतिहास डिलीट केला पण तरुणांपर्यंत इतिहास पोहचवणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

अधिक माहितीसाठी 8308123555 या क्रमांकावर किंवा www.sunnynimhan.com या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी सनी विनायक निम्हण यांनी केले.

Exit mobile version