Download App

पुण्यात नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; बनावट पोलिसाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक

भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवला. दरम्यान, वाहतूक नियोजन करणारा पोलीस नागरिकांना बंदुकीने मारहाण करत असल्याचे पाहायला मिळतय.

Image Credit: Letsupp

Pune News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (India) ज्यामध्ये वाहतूक नियोजन करणारा बनावट पोलीस नागरिकांना बंदुकीने मारहाण करत असल्याचं पाहायला मिळतय. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात (Viral video) भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवला. या विजयानंतर पुण्यामध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरत मोठा जल्लोष केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे.

संताप व्यक्त  Laws: स्वतंत्र्यानंतर पहिल्यांदाच कायद्यात बदल; ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे आजपासून हद्दपार

या व्हिडिओमध्ये एक बनावट पोलीस गाडीवरील तरुणांना आपल्या हातातील बंदूकीने मारत आहे. त्यामध्ये ती बंदुकही तुटल्याचं पाहायला मिळाल. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर युजर्सनी या प्रकरावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत टीका केली आहे.

बनावट पोलीस NTAकडून नीट परीक्षेचा निकाल जाहीर; देशभरात झालेल्या गोंदळानतर झाली होती पुनर्परीक्षा

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कारवाई करत विश्रामबाग पोलिसांनी दारूच्या नशेत पोलीस अधिकारी असल्याचं भासवून नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आयपीसी कलम 420, 170 आणि महाराष्ट्र मद्य कायदा कलम 85 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा बनावट पोलीस असल्याचं समोर आलं आहे.

follow us

वेब स्टोरीज