Punit Balan Group : राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेमध्ये पदकप्राप्त खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशप्राप्तीसाठी लागणारे उच्च प्रशिक्षण आणि तदर्थ सुविधा मिळवून देवून त्यांच्या सर्वार्थ प्रगतीसाठी आम्ही खेळाडूंच्या पाठीशी उभे राहू असं प्रतिपादन प्रसिद्ध युवा उद्योजक पुनीत बालन (Young Entrepreneur Punit Balan) यांनी केले. (Balan Group) या स्पर्धेत यवतमाळच्या वेदांत पारधसह, नमन काला (ठाणे), ओंकार काकड (संभाजीनगर), युवराज चौधरी (नागपूर), संस्कार लोकरे (सोलापूर), अर्जुन चोडणकर (मुंबई), शौर्यजित माळी (सांगली) आणि नागेश जुटे (नांदेड) यांनी आपापल्या वजन गटात बहारदार खेळी करत सुवर्णपदकावर नांव कोरलं आहे.
बारामती पॉवर मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात; पुनीत बालन ग्रुपचे सहकार्य
दिल्ली येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रीय सिनीयर्स गटातील स्पर्धेमध्ये महाराष्ट्रच्या श्रद्धा चोपडे हिने कालच सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. यावेळी बोलताना बालन यांनी श्रद्धाचा उल्लेख करत राज्यातील नैपुण्यप्राप्त ज्यूदोपटू केठळ आधुनिक सुविधा आणि उच्च प्रशिक्षणाच्या अभावाने मागे पडू नयेत ही आमची इच्छा आहे अशी भावना व्यक्त केली. तसच, खेळाडूंच्या समर्थनार्थ पुढे येणारे आमच्यासारखे प्रायोजक लक्षात घेता पालकानीही मोबाईलच्या जाळ्यापासून पाल्यांना दूर करत क्रीडांगणावर पाठवावे असंही ते म्हणाले.
5 टक्के आरक्षणाचे महत्व
राज्य ज्यूदी संघटनेचे कौतुक करताना बालन म्हणाले की, ज्यूदों या स्वसंरक्षण शिकवणाऱ्या खेळाच्या संपूर्ण प्रसारासाठी केले जाणारे कार्य प्रशंसनीय असून याद्वारे राज्यातील युवायुवतीना खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीसह नोकरीतील 5 टक्के आरक्षणाचे महत्व जनमानसात पटवून देण्याचे अथक परिश्रम राज्य ज्यूदो संघटना करत आहे, त्यामुळे संघटनेचे अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकत आहेत आणि शासनाच्या सेवेत रुजू होत आहेत.
उद्घाटन समारंभ
(दि. 06 ते 08 जानेवारी 2025) दरम्यान बालेवाडी-महाळुंगे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 51 व्या राज्यस्तरीय सबज्युनियर्स गटाच्या खुल्या ज्यूदो स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष धनंजय भौसले, महासचिव शैलेश टिळक, कोषाध्यक्ष रवींद्र मेटकर, तांत्रिक सचिव दत्ता आफळे, शेखर साखरे, विश्वास जोशी, मुकुंद डांगे या पदाधिकाऱ्यांसह स्पधर्धा निरीक्षक अनिल सकपाळ उपस्थित होते. स्पर्धेचे उद्द्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश गोययळे, तर प्रास्ताविक शैलेश टिळक आणि आभार दता आफळे यांनी मानले.
प्रमुख पाहूणे
राज्य संघटनेचे अध्यक्ष धनंजय ऑसले यांनी संघटनेतर्फे प्रमुख पाहूणे आणि खेळाडूंकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. या स्पर्धेतील विजेते पुढे होणाऱ्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करतील, स्पर्धेसाठी राज्यातील 26 जिल्ह्यामधून पावणेतीनशे मुले आणि मुली खेळाडूंसह 25 पंच आणि व्यवस्थापक तसेच संघटनेचे पदाधिकारी क्रीडानगरीत दाखल झाले आहेत. स्पर्धेसाठी साई प्रशिक्षक सुशील गायकवाड (अमरावती) हे प्रमुख सामनाधिकारी असून त्यांना तुषार सांगळे (पुणे) आणि मंगेश ओसले (ठाणे) हे सहकार्य करत आहेत तर ठाण्याच्या शैलेश देशपांडे यांची ज्यूरीपदी आणि दर्शना लख्खाणी यांची स्पर्धेच्या तांत्रिक संचालन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. उद्या मुलीच्या स्पर्धा होणार असून आज झालेल्या मुलांच्या स्पर्धाचे निकाल खालीलप्रमाणे,
कोणते कोणते गट
30 किलो खाली
सुवर्णः वेदांत पारधी, यवतमाळ
रौप्यः शुभम भंडारी, ठाणे
कास्यः प्रिन्स सोनवणे, लातूर
कांस्यः विराज भगत, नाशिक
35 किलो खाली
सुवर्णः नमन काला, ठाणे
रौप्य अजिंक्य रनावडे, पौडीजेए
कांस्यः पैतन अगत, नाशिक
कांस्यः विश्वजित धाउने, सांगली
40 किलो खाली
सुवर्णः ऑकार काकड, संभाजीनगर
रौप्यः प्रतिक व्यवहारे, क्रीडा प्रबोधिनी
कांस्यः प्रणव खैरनार, अमरावती
कांस्यः समर्थ राऊत, पिजेए
45 किलो खाली
सुवर्णः युवराज चौधरी, नागपूर
रौप्यः फैजान शेख, यवतमाळ
कांस्यः अर्जुन नरवडे, संभाजीनगर
कांस्यः कुश पंडित, ठाणे
50 किलो खाली
सुवर्णः संस्कार लोकने, सोलापूर
रौप्यः कुशान विवेदी, रायगड
कांस्यः आदित्य लिंभोरे, पीडीजेए
कांस्यः आर्यन मोकाशी, पिजेए
55 किलो खाली
सुवर्णः अर्जुन घोडणकर, मुंबई
रौप्यः रुद्र मुदिराज, पीडीजेए
कांस्यः दीपक तरके, नांदेड
कांस्यः स्वरूप परदेसी, कोल्हापूर
60 किलो खाली
सुवर्णः शौर्यजित माळी, सांगली
रौप्यः अयान शेख, मुंबई
कांस्यः पार्थ सपाटे, धारशिव
कांस्यः विश्वजित दांगट, पौडीजेए
66 किलो वर
सुवर्णः मनोज चौधरी, पौडीजेए
रौप्यः प्रतिक मदाणे, सोलापूर
कांस्यः देव गौतम, रायगड
कांस्यः उमर काझी, मुंबई
66 किलो खाली
सुवर्णः नागेश लुटे, नांदेड
रौप्यः ध्यान पंड्या, मुंबई
कांस्यः अभिषेक विधाते, अहिल्यानगर
कांस्यः अवनिश करंगुटकर, सिंधुदुर्ग