Download App

धक्कादायक, पुण्यात महिलेकडून अफूची शेती, पोलिसांची थेट शेतात धाड अन्…

Pune Crime :  पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनहद्दीत (Loni Kalbhor Police Station) अफू या (Opium) अमली

  • Written By: Last Updated:

Cultivating Opium In Pune :  पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनहद्दीत (Loni Kalbhor Police Station) अफू या (Opium) अमली पदार्थाची शेती करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये मंगल दादोसा जवळकर या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी महिलेकडून अफूची शेती करण्यात येत होती.

लोणी काळभोर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी थेट शेतात धाड टाकून 66 अफूची झाडे जप्त केली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

पाकिस्तानी खेळाडू नको, द हंड्रेड लीग ड्राफ्टमध्ये 50 खेळाडूंना खरेदीदार नाही 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वाढत असणाऱ्या गुन्हेगारीवरून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नुकतंच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीसोबत घडललेया अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

महायुतीत नाराजीनाट्य, निधी वाटपावरून अजितदादांवर शिवसेनेनंतर भाजपही नाराज?

पंढरपुर येथे पकडले 208 किलो गोमांस 

तर दुसरीकडे पंढरपुरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 208 किलो गोमांस पकडले आहे. माहितीनुसार, धुलिवंदनाच्या दिवशी विक्रीसाठी आणलेले गोमांस पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात पंढरपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

follow us