स्मृती मंधानाची ICC T20 क्रमवारीत थेट टॉप 5 मध्ये झेप, 124 धावांचा धडाका

मंधानाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव केला आणि आशिया कपच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं.

News Photo   2026 09 08T175203.298

स्मृती मंधानाची ICC T20 क्रमवारीत थेट टॉप 5 मध्ये झेप, 124 धावांचा धडाका

वुमन्स आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध (Cricket) वादळी खेळी करणाऱ्या स्मृती मंधानाला तिच्या शानदार कामगिरीचा मोठा फायदा झाला आहे. हाँगकाँगविरुद्ध मंधानाने तब्बल 124 धावांची खेळी करत सामन्याला एकतर्फी वळण दिलं होतं. या दमदार प्रदर्शनामुळे ICC T20 क्रमवारीत तिने थेट टॉप 5 मध्ये प्रवेश केला आहे.

मंधानाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव केला आणि आशिया कपच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंधानाचं हे 18वं शतक ठरलं असून, या खेळीसह तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही आपलं नाव ठळकपणे नोंदवलं आहे.

भारतासाठी दिलासा, स्टार खेळाडू करणार अफगाणिस्तानविरुद्ध पुनरागमन

दरम्यान, स्मृतीसोबतच भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मानेही क्रमवारीत दमदार कामगिरी केली आहे. T20 गोलंदाजांच्या क्रमवारीत दीप्तीने 6वं स्थान मिळवलं असून, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ती 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंच्या क्रमवारीतही मोठी सुधारणा झाली आहे.

आता भारताचा उपांत्य फेरीतील सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. भारतासमोर कोणता संघ असेल, याचा निर्णय बांग्लादेश आणि UAE यांच्यातील सामन्यानंतर होणार आहे. भारताने वुमन्स आशिया कप स्पर्धेवर आतापर्यंत 7 वेळा नाव कोरलं आहे, मात्र 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यंदा पुन्हा विजेतेपद मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

Exit mobile version