मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटू ठार, मालिका रद्द

Pakistan vs Afghanistan : क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेट

Pakistan Vs Afghanistan

Pakistan Vs Afghanistan

Pakistan vs Afghanistan : क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेट खेळाडू ठार झाले आहे. ज्यामुळे आता अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नोव्हेंबर महिन्यात होणारी टी20 मालिका रद्द करण्यात आली आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री अफगाणिस्तानवर (Pakistan vs Afghanistan) हवाई हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानी सैन्याने आग्नेय पक्तिका प्रांतातील अर्गुन आणि बारमल जिल्ह्यात हवाई हल्ला केला आणि या हल्ल्यात तीन अफगाणी खेळाडू ठार झाले. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून (Pakistan Afghanistan War) करण्यात आलेल्या हल्ल्यात तीन क्लब-स्तरीय क्रिकेट खेळाडू ठार झाले आणि इतर चार जण जखमी आहे. हे खेळाडू पक्तिका येथील शराणा येथे सामना संपवून अर्गुनला परतत असताना हल्ला झाला.

तर दुसरीकडे हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा कतारच्या मध्यस्थीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धबंदी आणि शांतता चर्चा सुरू होती. मात्र पाकिस्तानने युद्धबंदी जाहीर केली असताना, त्यांनी अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला.

मालिका रद्द

पाकिस्तानी हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) हवाई हल्ल्यात अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युची पुष्टी करणारे निवेदन जारी केले. पुढील महिन्यात, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबतच्या तीन देशांच्या टी20 क्रिकेट मालिकेतूनही बोर्डाने औपचारिकपणे माघार घेण्याची घोषणा केली. अफगाण नागरिकांच्या शहीद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळणे नैतिकदृष्ट्या अशक्य असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

आईच्या हस्ते ‘वेल डन आई’चा ट्रेलर प्रदर्शित! 31 ऑक्टोबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Exit mobile version