Stampede in Bengaluru : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ला ६ धावांनी पराभव करत ट्रॉफी आपल्या नावावर केली. आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याने देशभरातून चाहते शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, या विजयानंतर उत्सवाचे वातावरण दुःखात बदललं आहे. चिन्नास्वामी स्टेडियममधील आनंदोस्तव रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता संख्या आठ झाली आहे. तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
बंगळुरू संघाच्या विजयानंतर बंगळुरू शहरातील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. हे सर्वजण बंगळुरूच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र याच वेळी अचानक येथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता ती संख्या वाढून आठ झाली आहे. मृत्यू झालेले नेमके कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाहीत.
बंगळुरूमध्ये ;च्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी; ८ जणांचा मृत्यू, आकाडा वाढण्याची भीती
कर्नाटक क्रिकेट असोशिएशनतर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे बडे नेते उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते.
यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हादेखील येणार होता. या सर्वांचाच या कार्यक्रमात सत्कार होणार होता. ही बाब समजल्यानंतर स्टेडियमच्या बाहरे बंगळुरू संघाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर गर्दी अनियंत्रित झाली आणि यात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 15 ते 20 जण यात जखमी झाले आहेत. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
#WATCH | Bengaluru: #IPL2025Champions #RoyalChallengersBangalore Captain Rajat Patidar lifts up the #IPL2025 trophy and shows to the crowd as the team arrives at Vidhana Soudha pic.twitter.com/8j4JdfjxUr
— ANI (@ANI) June 4, 2025
#WATCH | A car was damaged after fans climbed over it outside the M Chinnaswamy Stadium in Bengaluru
A large number of #RoyalChallengersBengaluru fans have turned up here to catch a glimpse of their champion team.
A special felicitation ceremony for all RCB players has been… pic.twitter.com/WuNrbo5Bzh
— ANI (@ANI) June 4, 2025