Abhishek Porel Arrested in West Bengal Over Rape Allegation : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा युवा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल (Abhishek Porel) अडचणीत आला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी 23 वर्षीय पोरेलला बलात्काराच्या आरोपाप्रकरणी अटक केली आहे. दमदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमामी सिटी परिसरातून सोमवारी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले.
पाकला धडकी भरणार ! Agni-6 क्षेपणास्त्र पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकते?
पोरेलविरोधात जूनच्या सुरुवातीला तक्रार दाखल करण्यात आली होती. लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे, शारीरिक मारहाण करणे आणि धमकी दिल्याचा आरोप संबंधित तरुणीने त्यावर केला आहे. हुगळी जिल्ह्यातील मोगरा पोलीस ठाण्यात तरुणीने आणि तिच्या आईने ही तक्रार दाखल केली होती.
तीन वर्षांपासून संबंध असल्याचा दावा
तक्रारीनुसार, पोरेल आणि संबंधित तरुणी गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र, मागील वर्षापासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर पोरेलने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
ड्रग्ज व्हिडिओवरून हरभजन सिंग अडचणीत; पंजाब पोलिसांसह सत्ताधाऱ्यांचा पलटवार
पोरेलने आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावरून त्याने लैंगिक संबंध ठेवले, असा आरोप तरुणीने केला आहे. त्यानंतर पोरेल लग्नास नकार देत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित तरुणी कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
कलकत्ता उच्च न्यायालयाने पोरेलच्या अटकेचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. हुगळी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कुणार भूषण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरेलविरोधात आधीच गुन्हा दाखल होता आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव 2026’ ला अमेरिकन-भारतीय रसिकांची विक्रमी दाद!
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह कलम 69 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोरेलने आरोप फेटाळले
दरम्यान, अभिषेक पोरेलने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत तपासली जाणार आहे.
IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो पोरेल
अभिषेक पोरेल हा डावखुरा यष्टिरक्षक-फलंदाज असून 2023 पासून दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. आतापर्यंत त्याने IPLमध्ये 35 सामने खेळले असून 145 च्या आसपासच्या स्ट्राईक रेटने 765 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार अर्धशतके आहेत. पोरेलने 2021-22च्या हंगामात बंगालकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने इंडिया ‘ए’ संघाचे प्रतिनिधित्व करत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौरेही केले आहेत. त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 32 फर्स्ट क्लास आणि 23 लिस्ट ‘ए’ सामने आहेत.
या अटकेमुळे आता पोरेलच्या क्रिकेट कारकिर्दीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
