Download App

मोठी बातमी! कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल, भूपिंदरसिंग बाजवांकडे कुस्तीची कमान

adhoc committee : महिला खेळाडूंच्या लैंगिक छळाचे आरोप असलेले भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी त्यांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) मोठा निर्णय घेतला आहे. आयओएने तीन सदस्यीय एडहॉक समिती (adhoc committee) स्थापन केली आहे.

या समितीचे अध्यक्षपद भूपिंदरसिंग बाजवा (Bhupinder Singh Bajwa) यांच्याकडे देण्यात आले आहे. याशिवाय एमएम सौम्या आणि मंजुषा कुंवर हे सदस्य असतील. भारतीय कुस्ती महासंघाला (WFI) निलंबित केल्यानंतर ऑलिम्पिक संघटनेने तीन दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी (24 डिसेंबर) कुस्ती महासंघाला निलंबित केले होते.

कुस्ती महासंघाचे निलंबन करताना मंत्रालयाने म्हटले होते की, नवनिर्वाचित मंडळाने प्रक्रियेचे पालन केले नाही आणि कुस्तीपटूंना तयारीसाठी पुरेसा वेळ न देता अंडर-15 आणि अंडर-20 राष्ट्रीय चॅम्पियनशिपची घाईघाईने घोषणा केली.

दरम्यान, रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने (21 डिसेंबर) संजय सिंह यांच्या निवडीच्या निषेधार्थ कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर बजरंग पुनियाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती. जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगटने (26 डिसेंबर) आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला होता.

follow us