पुणे : सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि न्युझीलंड या दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे. न्यूझीलंडने त्यांचे चारही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ तिन्ही सामने जिंकत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे.
भारतीय संघाला आता चौथा सामना आज (१९ ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळायचा आहे. जर भारताने हा सामना जिंकल्या न्यूझीलंडला मागे टाकून भारत पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान होईल. शिवाय किवी संघासोबत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अगदी जवळ येईल. (After defeating Bangladesh, the Indian team will have to win at least 3 more matches to secure their place in the semi-finals)
सध्या भारतीय संघ 3 सामने जिंकून 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाला बांग्लादेशविरुद्धच्या सामना झाल्यानंतर 5 सामने खेळायचे आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला या उर्वरित 5 पैकी किमान 3 ते 4 सामने जिंकावे लागतील.
आजच्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाने पुढील 2 सामने जिंकले, तर 6 विजयांसह 12 गुणांसह उपांत्य फेरीसाठी मजबूत दावा करेल. मात्र उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला पुढील आणखी किमान 3 सामने जिंकावे लागणार आहेत.
भारतीय संघाला पुण्यातील सामन्यानंतर धर्मशाला येथे न्यूझीलंड, लखनऊमध्ये इंग्लंड, मुंबईत श्रीलंका, कोलकाता येथे दक्षिण आफ्रिका आणि बेंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्ध उर्वरित सामने खेळायचे आहेत. यात संघाला न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याकडून चांगले आव्हान मिळू शकते. मात्र बांगलादेश आणि नेदरलँड हे उलथापालथ घडवण्यात तज्ञ आहेत. अशा स्थितीत त्यांच्याबाबतही भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे.
8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई (भारतीय संघ 6 गडी राखून विजयी)
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली (भारतीय संघ 8 गडी राखून विजयी)
14 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद (भारतीय संघाने सामना 7 गडी राखून जिंकला)
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर – भारत विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू