Anaya Bangar makes comeback to cricket Cricket Australia offered chance to play whats BCCIs rule : क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा उतरण्याच्या दिशेने अनाया बांगरने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या विद्यमान नियमांनुसार मार्च 2027 पासून एलीट महिला क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आपण पात्र ठरू शकतो. त्यामुळे भविष्यात ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये खेळण्याची संधी तिच्यासमोर निर्माण होऊ शकते. मुंबईत वयोगटातील क्रिकेट खेळलेल्या अनायाला संक्रमणाच्या प्रक्रियेदरम्यान काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता तिच्यासाठी भावनिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची आहे.
पुन्हा क्रिकेट खेळण्याची आशा
पुन्हा क्रिकेट खेळण्याची संधी मिळू शकते, हे समजल्यानंतरचा दिवस आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याचे अनायाने म्हटले आहे. काही काळापूर्वी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरता येईल की नाही, याबाबतच तिच्या मनात अनिश्चितता होती. मात्र, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धोरणामुळे पुनरागमनाचा मार्ग खुला झाल्याने तिने समाधान व्यक्त केले आहे. क्रिकेटमध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळण्यामागे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धोरणाची महत्त्वाची भूमिका आहे. या धोरणाअंतर्गत एलीट क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या समावेशासाठी ठरवलेल्या निकषांनुसार अनाया पात्र असल्याचे सांगण्यात येत आहे.
पात्रता मिळाली म्हणजे WBBL करार निश्चित नाही
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धोरणानुसार पात्रता मिळणे ही अनायासाठी महत्त्वाची सुरुवात असली, तरी त्याचा अर्थ तिला थेट महिला बिग बॅश लीगमधील कोणत्याही संघाकडून करार मिळेल, असा नाही. WBBLमध्ये परदेशी खेळाडूंसाठी ड्राफ्ट आणि कराराची स्वतंत्र प्रक्रिया आहे. फ्रँचायझी उपलब्ध आंतरराष्ट्रीय खेळाडूंमधून आपल्या संघासाठी निवड करू शकतात. याशिवाय ड्राफ्टपूर्वी परदेशी खेळाडूंसोबत थेट करार करण्याचीही तरतूद आहे.त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मिळणारी पात्रता ही अनायाच्या पुनरागमनातील पहिली पायरी ठरणार आहे. त्यानंतर तिला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आपली क्षमता आणि कामगिरी सिद्ध करावी लागेल. मैदानावरील चांगली कामगिरी झाल्यास WBBL फ्रँचायझींचे लक्ष तिच्याकडे वेधले जाऊ शकते.
पंतप्रधान मोदींना हटवण्याच्या हालचाली, शहांसोबत कुणी काम करायला तयार नाही, राऊतांचे खळबळजनक दावे
तर दुसरीकडेअनायाने या विषयावर बीसीसीआयकडेही मार्गदर्शन मागितले होते. मात्र, अद्याप बोर्डाकडून तिला कोणतेही अधिकृत उत्तर मिळालेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात ट्रान्सजेंडर महिलांना स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी करून घेण्याबाबत बीसीसीआयकडे सध्या स्पष्ट नियम किंवा स्वतंत्र धोरण उपलब्ध नाही. हा प्रकार बोर्डासमोर प्रथमच आल्याने याबाबत अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
कोण आहे अनाया बांगर?
अनाया बांगर ही माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी आहे. तिचे पूर्वीचे नाव आर्यन बांगर होते. मुंबईत वाढलेल्या अनायाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती.तिने मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत शिक्षण घेतल्यानंतर रिझवी कॉलेजमधून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. क्रिकेटमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने तिने इस्लाम जिमखाना येथे प्रशिक्षण घेतले. याच काळात यशस्वी जैस्वाल, सरफराज खान आणि मुशीर खान यांच्यासोबत क्रिकेट खेळल्याचेही सांगितले जाते. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धोरणांतर्गत एलीट महिला क्रिकेटसाठी पात्र ठरण्याच्या दाव्यानंतर अनाया पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तिच्या पुढील क्रिकेट प्रवासाकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
