Download App

Asia Cup 2023 : पाकिस्तानचा आणखी एक विजय; सुपर 4 मध्ये बांग्लादेशवर मात

Asia Cup 2023 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup 2023) पाकिस्तानने विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. सुपर 4 फेरीत काल झालेल्या पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (PAK vs BAN) सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशचा पराभव करत विजयी आघाडी घेतली. या सामन्यात बांग्लादेशने सुमार फलंदाजी करत फक्त 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानी संघाने हे माफक आव्हान सहज पार केले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशची फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. पाकिस्तानी गोलंदाजांच्या माऱ्यापुढे बांग्लादेशच्या फलंदाजांना फार काही करता आले नाही. नियमित अंतराने त्यांच्या विकेट पडत गेल्या. कसेतरी 194 धावांचे लक्ष्य देता आले. बांगलादेशकडून यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक धावा केल्या. मुशफिकुर रहीमने 87 चेंडूत 64 धावांची खेळी केली.

पाकिस्तानी गोलंदाजांचा कहर

पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हरिस रौफने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय नसीमने बांगलादेशच्या 3 खेळाडूंना बाद केले. शाहीन आफ्रिदी, फहीम अश्रफ आणि इफ्तिखार अहमद यांना 1-1 यश मिळाले. तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शकीब बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव पत्त्याच्या घरासारखा कोसळला. शकीबनंतर मुशफिकर रहीमनेही चालायला सुरुवात केली. त्याचवेळी बांगलादेशच्या खालच्या फळीतील फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात पाकिस्तानी गोलंदाजांना फारशी अडचण आली नाही.

यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी संयमाने सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा काढल्या. दहाव्या ओव्हरमध्ये पहिली विकेट पडली. त्यानंतर 16 व्या ओव्हरमध्ये कर्णधार बाबर आझम आऊट झाला. त्यानंतर मागील फलंदाजांनी 39.3 ओव्हरमध्येच 194 धावांचे लक्ष्य गाठले.

PAK vs BAN : बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली, पाकसमोर 194 धावांचे आव्हान

Tags

follow us