Download App

Asia Cup 2025 कधी होणार, ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 बाबत सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी

  • Written By: Last Updated:

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 बाबत सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानसोबत (Pakistan) खेळण्यास नकार दिल्याने आशिया कप 2025 स्पर्धे रद्द होणार असल्याची माहिती समोर आली होती मात्र आता आशिया कप 2025 बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

माहितीनुसार, बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबीकडून (PCB) लवकरच या स्पर्धेबाबत मोठी घोषणा करण्यात येणार आहे. 17 जुलै ते 20 जुलै दरम्यान कोलंबो येथे एसीसीची वार्षिक सर्वसाधरण सभा होणार असून या बैठकीत बीसीसीआय आणि पीसीबीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहे. या बैठकीनंतर आशिया कप 2025 बाबत दोन्ही क्रिकेट बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आशिया कप 2025 बाबत निर्णय लवकरच

तर दुसरीकडे आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघ सहभागी होणार का आणि जर सहभागी झाला तर पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती मात्र आता केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळणार अशी घोषणा केल्यानंतर आता बीसीसीआयकडून आशिया कप 2025 साठी तयारी सुरु झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी केलेल्या घोषणेनंतर आशिया कप आयोजित करणाऱ्या समितीला मोठा दिलासा मिळाला आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यातून एसीसीला (ACC) सर्वाधिक उत्पन्न मिळतो. त्यामुळे मनसुख मांडवीया यांच्या या घोषणेनंतर एसीसी मोठ्या आर्थिक नुकसानापासून वाचणार आहे.

भारताची दमदार कामगिरी

श्रीलंकेत 2023 मध्ये झालेल्या आशिय कपमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करत ट्रॉफी जिंकली होती. या सामन्यात श्रीलंका 50 धावांवर ऑलआउट झाला होता. मोहम्मद सिराजने या सामन्यात 6 विकेट घेतले होत. तर भारतीय संघाने हा सामना फक्त 6.1 ओव्हरमध्ये जिंकला होता.

दुबार पेरणीचं संकट, हवामान विभागाचा नवा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढणार 

follow us