Asian Games 2023 : पुरुष भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याने भारताला विजेता घोषित करण्यात आले. भारतीय संघाच्या खात्यात आणखी एका सुवर्णाची भर पडली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही.
हांगझू येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाने 18.2 षटकात 5 गडी गमावून 112 धावा केल्या होत्या. यानंतर पावसाने व्यत्यय आणल्याने सामना पुढे जाऊ शकला नाही. अफगाणिस्तानसाठी सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. संघाने दुसऱ्या षटकात 5 धावांवर पहिली विकेट गमावली. सलामीवीर झुबैद अकबरी 5 धावा करून बाद झाला.
Asian Games 2023 : अटीतटीच्या सामन्यात महिला कबड्डी संघाची तैवानवर मात; गोल्ड मेडल जिंकलं
यानंतर अफगाणिस्तानने तिसर्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शहजादच्या (4) रूपाने दुसरी विकेट गमावली. या विकेटमधून संघाला सावरता आले नाही आणि तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नूर अली झद्रानच्या रूपाने तिसरी विकेट गमावली. झद्रान अवघी 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अफगाणिस्तानने काही काळ विकेट्स वाचवल्या असल्या, तरी 10 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अफसर झझाई (15) बाद झाला. त्यानंतर 11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर करीम जनातच्या (1) रूपाने संघाने पाचवी विकेट गमावली.
World Cup 2023 : पाकिस्तानने पहिला सामना जिंकला… पण नेदरलँड्सचा एकटा पठ्ठ्या नडला !
सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी
यानंतर शाहिदुल्ला कमाल आणि कर्णधार गुलबदिन नायब यांच्यात सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली, मात्र पावसाने सामना थांबवला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 60 (45) धावा जोडल्या. यादरम्यान शाहिदुल्ला कमालने 49 (43) आणि कर्णधाराने 27 (24) धावा केल्या होत्या.
या दरम्यान भारताकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्शदीप सिंग, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. बिश्नोईने 4 षटकात फक्त 3 च्या इकॉनॉमीसह 12 धावा दिल्या.