Download App

वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशची धडाकेबाज सुरुवात; अफगाणिस्तानचा दारुण पराभव

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकमधील (World Cup 2023) तिसरा सामना बांग्लादेश आणि अफगाणिस्तान (BAN vs AFG) यांच्यात धरमशाला येथील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने 6 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला अफगाणिस्तानचा संघ 37.2 षटकात 156 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात बांग्लादेशने 34.4 षटकांत लक्ष्य गाठले.

बांग्लादेशची खराब सुरुवात
157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांग्लादेशच्या संघाने 5 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 19 धावांवर तांदीझ हसनच्या रूपाने पहिली विकेट गमावली. सलामीवीर तंदीज अवघ्या 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाचा दुसरा सलामीवीर लिटन दास 7व्या षटकातील चौथ्या चेंडूवर बाद झाला. लिटन दास 2 चौकारांच्या मदतीने 13 (18) धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला.

मेहदी हसन मिराजने अर्धशतक झळकावले
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मेहदी हसन मिराजने बांग्लादेशला डाव सावरला. त्याने 5 चौकारांच्या मदतीने 57 (73) धावांची खेळी केली. 29व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मेहदी हसन बाद झाली. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने त्याला आपला शिकार बनवले. यानंतर बांग्लादेशची चौथी विकेट कर्णधार शकिब अल हसनच्या रूपाने पडली. कर्णधार शाकिब 14 (19) धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला.

भारत-ऑस्ट्रेलिया उद्या महामुकाबला; प्रथम फलंदाजी की गोलंदाजी, जाणून घ्या कशी आहे चेन्नईची खेळपट्टी?

नजमुल हुसेन शांटोने अर्धशतक झळकावले
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नझमुल हुसेन शांटोने नाबाद अर्धशतक झळकावत संघाला विजयाकडे नेले. त्याच्यासोबत मुशफिकर रहीम नाबाद परतला. शांटो 59 (83) आणि मुशफिकर रहीम 2 धावा करून नाबाद परतले.

IND vs IRAN Kabaddi : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतच कबड्डीचा बादशहा! इराणचा पराभव करत सुवर्ण कामगिरी…

अफगाणिस्तानसाठी राशिद खानने सर्वाधिक 9 षटके टाकली. यात त्याने 48 धावा दिल्या. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर फजल हक फारुकी, नवीन उल हक आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Tags

follow us