IND vs SA : आधी टी नंतर लंच ब्रेक, गुवाहाटी कसोटीच्या वेळेत बदल; BCCI चा मोठा निर्णय

IND vs SA : क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

IND Vs SA

IND Vs SA

IND vs SA : क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन कसोटी सामन्यांची मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणार आहे. तर या मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने वेळेत बदल केलं आहे.

भारतात सहसा कसोटी सामन्याची सुरुवात सकाळी 9:30 वाजता सुरू होत असते. पहिले सत्र दोन तासांचे असते, त्यानंतर 40 मिनिटांचा लंच ब्रेक आणि दुसरे सत्र दोन तासांचे असते. तिसरे सत्र 20 मिनिटांच्या टी ब्रेकनंतर सुरू होते. मात्र गुवाहाटी कसोटीसाठी असे होणार नाही.

गुवाहाटी कसोटीच्या वेळेत बदल

गुवाहाटी (Guwahati Test) देशाच्या ईशान्य भागात असल्याने येथे सूर्य लवकर उगवतो आणि मावळतो. नोव्हेंबर महिन्यात गुवाहाटीमध्ये सूर्य सकाळी 5.30 वाजता उगवतो आणि संध्याकाळी 4:30 वाजता मावळतो म्हणूनच भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सकाळी 9:00 वाजता खेळवला जाईल. टॉस सकाळी 8:30 वाजता होईल. सकाळी 11:00 वाजता टी ब्रेक ( Tea Break) होणार यानंतर 20 मिनिटांनी खेळ पुन्हा सुरू होईल. दुपारी 1:20 वाजता लंच ब्रेक (Lunch Break) होणार यानंतर दुपारी 2:00 वाजता खेळ पुन्हा सुरू होईल आणि दुपारी 4:00 वाजेपर्यंत चालेल. जर निर्धारित वेळेत षटके पूर्ण झाली नाहीत तर खेळ अर्ध्या तासाने वाढवता येईल. तथापि, सूर्यास्त दुपारी 4.30 च्या सुमारास होईल.

पार्थ पवार व्यवहार रद्द करु शकत नाही, अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानियांची मागणी

बरसापारा स्टेडियमवर पहिला कसोटी सामना

गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवरील हा पहिला कसोटी सामना असेल. कसोटी सामना आयोजित करणारे हे भारतातील 30 वे स्टेडियम असेल. 2017 मध्ये तेथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. आतापर्यंत तेथे तीन टी20 आंतरराष्ट्रीय आणि दोन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत.

Exit mobile version