Maharashtra Kesari : कोल्हापुरात झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरची भाग्यश्री फंड विजेती ठरली. तीने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला नमवत हा किताब पटकावला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून राजर्षी शाहू खासबाग मैदानात ही कुस्ती स्पर्धा झाली. कोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले.
पहिल्या उपांत्य फेरीत भाग्यश्रीने सांगलीच्या प्रतीक्षा बागडीचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीत अमृता पुजारीने कोल्हापूरच्याच वैष्णवी कुशाप्पाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
‘यह तो सिर्फ झांकी है, आगे…’, खासदार सुजय विखेंचा महाविकास आघाडीला इशारा
यावेळी विजेत्या भाग्यश्रीला पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चांदीची गदा व चारचाकी गाडीची चावी सुपूर्द करण्यात आली. तर प्रत्येक वजनगटातील विजेत्या पैलवानांना दुचाकी प्रदान करण्यात आली.
यावेळी दीपाली भोसले-सय्यद यांनी पुढील वर्षीची स्पर्धा ठाण्यात घेणार असल्याचे सांगितले. तीनवेळा महाराष्ट्र केसरी विजेत्यांना क्लास वन नोकरी द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली.