रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बिहार आणि अरुणाचल प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा अरूणाचल प्रदेशच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. (Sports) अरूणाचल प्रदेशने पहिल्या डावात 10 गडी गमवून 105 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्याच डावात बिहारने मोठी आघाडी घेतली. बिहारने 116.3 षटकात 9 गडी गमवून 542 धावांचा डोंगर रचला आणि डाव घोषित केला. पहिल्याच डावात बिहारकडे 437 धावांची आघाडी होती. या डावात उपकर्णधार वैभव सूर्यवंशीने 5 चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि 1 षटकार मारून 14 धावांवर बाद झाला.
बिहारकडून आयुष लोहोरुकाने एका बाजूने अरूणाचल प्रदेशाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. त्याने 247 चेंडूंचा सामना करत 37 चौकार आणि 1 षटकार मारत 226 धावा केल्या. अमाव किशोरने 52, कर्णधार गनीने 59, बिपिन सौरभने 52 आणि सचिन कुमारने 75 धावांची खेली केली. त्यांच्या खेळीमुळे बिहारने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. अरुणाचल प्रदेशचा संघ 437 धावांची आघाडी मोडून काढतानाच संपला. दुसऱ्या डावात कशी बशी 272 धावांपर्यंत मजल मारली. पण आघाडी काही मोडता आली नाही. तेची नेरीने 128 धावांची खेळी केली. मात्र, त्याला इतरांची काही साथ लाभली नाही.
संपूर्ण 272 धावांवर तंबूत परतला. बिहारने या सामन्यात एक डाव आणि 160 धावांनी विजय मिळवला.बिहारचा साकीब हुसेन हा अरुणाचल प्रदेशवर भारी पडला. त्याने पहिल्या डावात 11.3 षचटकात 41 धावा देत 6 गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात 16 षटकात 58 धावा देत 4 गडी बाद केले. हिमांशु सिंहने दुसऱ्या डावात 3 गडी बाद केले. तर सचिन कुमारने 2 गडी तंबूत पाठवले. या सामन्यात उपकर्णधार वैभव सूर्यवंशीकडून क्रीडाप्रेमींना अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षाभंग झाला. आता पुढच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
अरुणाचल प्रदेश (प्लेइंग इलेव्हन): नीलम ओबी (कर्णधार), जैनाथ मानसिंग, कमशा यांगफो (विकेटकीपर), तेची डोरिया, अभिनव सिंग, सिद्धार्थ बलोदी, तेची नेरी, लिमार दाबी, तडाकमल्ला मोहित, नबाम डोल, याब निया निया
बिहार (प्लेइंग इलेव्हन): साकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, बिपिन सौरभ (विकेटकीपर), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, रघुवेंद्र प्रताप सिंग, आमोद यादव, सचिन कुमार, हिमांशू सिंग, नवाज खान, साकिब हुसेन