Download App

IPL Points Table: चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ, पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातशी भिडणार

  • Written By: Last Updated:

IPL Points Table: दिल्ली कॅपिटल्सचा 70 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून, चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. तत्पूर्वी, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. याशिवाय गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना जवळपास निश्चित झाला आहे. वास्तविक लखनौ सुपर जायंट्सला त्यांचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. त्यानंतर क्रुणाल पंड्याचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. असे झाल्यास लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिला क्वालिफायर खेळला जाईल. यासाठी लखनौ सुपर जायंट्सला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध किमान 97 धावांनी विजय मिळवावा लागेल.

राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल का?

त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. लखनौ सुपर जायंट्सचे 13 सामन्यांत 15 गुण आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर तो प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरेल. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 13 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स 14 सामन्यांत 14 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे, मात्र या संघाचा प्लेऑफमधील प्रवेश मुंबई इंडियन्सच्या सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल.

मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये कशी पोहोचेल?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहोचेल. मुंबई इंडियन्सचे 13 सामन्यांत 14 गुण आहेत. रविवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादसमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचे 13 सामन्यांत 12 गुण आहेत. नितीश राणाच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध विजय मिळवला, तर ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहतील, परंतु त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

याशिवाय दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहेत. म्हणजेच आतापर्यंत तिन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तर उर्वरित 2 जागांसाठी 5 संघ दावेदार आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज