Download App

टीम इंडियाचं बॅडलक! दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा विजय; शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकला

पहिला सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंडचा संघ विजेता ठरला. त्यामुळे आता या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.

IND vs ENG : इंग्लंडमध्ये अंडर 19 क्रिकेट संघात एकदिवसीय सामन्यांची (IND vs ENG) मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या यूथ वनडेमध्ये इंग्लंडने (England Cricket) बाजी मारली. टीम इंडियाचा 1 विकेटने (Team India) पराभव झाला. पहिला सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंडचा संघ विजेता ठरला. त्यामुळे आता या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली राहिली नाही. कर्णधार आयुष म्हात्रे शून्यावरच बाद झाला. यानंतर आलेल्या वैभव सूर्यवंशीने चांगली फलंदाजी केली. त्याने एकूण 45 धावा केल्या. भारताचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. सर्वाधिक धावा विहान मल्होत्राने केल्या. त्याने 49 धावा केल्या.

यानंतर राहुल कुमारने 47, कनिष्क चौहानने 45 आणि अभिज्ञान कुंडूने 32 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून एलेक्स फ्रेंचने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जॅक होम आणि एलेक्स ग्रीन या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. भारताने इंग्लंडसमोर 291 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आ्व्हान चांगले होते.  परंतु, भारतीय गोलंदाजांना या आव्हानाचा बचाव करता आला नाही.

इंग्लंडला पहिल्याच सामन्यात ६ विकेट्सने चारली धूळ; अंडर 19 टीम इंडियाचा मोठा विजय

सामना झाला थरारक

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात देखील चांगली राहिली नाही. बेन डॉकिंस फक्त 7 करुन परतला. यानंतर इसाक आणि तिसरी विकेट बेन मेसच्या रुपात पडली. यानंतर इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रूयू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफने डाव सावरला. त्याने 39 धावा केल्या. यानंतर आलेल्या कर्णधार थॉमस रियूने शतक झळकावले. यामुळे इंग्लंडचा विजय अधिक सोपा झाला. रियूने 89 चेंडूंत 6 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 131 धावा केल्या.

शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता होती. यातच इंग्लंडचे 9 फलंदाज बाद झाले होते. भारताला विजयाची संधी होती. काहीही घडू शकत होतं. परंतु, येथेही नशीबाने इंग्लंडलाच साथ दिली. शेवटच्या ओव्हरमधील 3 चेंडू शिल्लक ठेवत इंग्लंडने सामना जिंकला. भारताकडून अंबरिशने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हेनिल पटेल आणि युद्धजीत गुहा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

..तर सात दिवस खेळाडूला मैदानात NO ENTRY; क्रिकेटच्या नियमांत ICC कडून मोठा बदल

follow us