Download App

Delhi Wrestlers Protest : महिला असूनही… ‘त्या’ वक्तव्यानंतर पहिलवानांच्या निशाण्यावर पीटी उषा

Delhi Wrestlers Protest : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं.

भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) चे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरूद्ध लैंगिक शोषणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्या विरोधात हे पहिलवान मैदानात उतरले होते. दरम्यान कुस्तीपटूंच्या तक्रारी सोडवण्याच्या पहिल्या टप्प्यात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते.

मात्र आता पुन्हा दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी सोमवारी पत्रकार परिषद (Press conference)घेऊन तक्रार नोंदवून न घेण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh)यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी कारवाईची मागणी केली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा (Bhupinder Singh Hooda)यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal)आणि इतर नेत्यांनीही दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Brijbhushan Singh : नीरज चोप्रा, कपिल देवही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मैदानात; कुस्तीपटूंच्या आंदोलनाला क्रीडाविश्वातून पाठिंबा वाढला

मात्र या खेळाडुंच्या या आंदोलनावर आणि या आंदोलनाला राजकीय पक्ष पाठिंबा देत असल्याने महान अॅथलीट आणि भारतीय ऑलंपिक संघाची अध्यक्षा पीटी उषा यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, रस्त्यांवर असं आंदोलन करण बेशिस्तपणा आणि देशाची प्रतिमा खराब करणार आहे. तसेच लैंगिक अत्याचारांवर कारवाई करण्यासाठी भारतीय ऑलंपिक संघ आहे. असं वक्तव्य पीटी उषा यांनी केलं.

यावरून आंदोलक खेळाडुंनी पीटी उषा यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये बजरंग पूनिया म्हणाला की पीटी उषा यांचे वक्तव्य ऐकूण दुःख झाले. त्या एक महिला असूनही त्यांनी महिलांचे दुःख समजत नाही. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. आता त्याला बेशिस्तपणा म्हटलं जात आहे. याचं दुःख होत आहे.

Tags

follow us