T20 World Cup : टी20 विश्वचषक 2026 साठी इंग्लंडने आपला तात्पुरता संघ जाहीर केला आहे. या संघात जोफ्रा आर्चरसह अनेक स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. इंग्लंडकडून आज विश्वचषक आणि श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी संघांचीही घोषणा केली आहे. अॅशेस मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या जोश टोंगचा देखील पहिल्यांदाच टी20 संघात समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर टॉम बँटनचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
टी20 विश्वचषक (T20 World Cup) आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी जोफ्रा आर्चरला विश्रांती देण्यात आली आहे तर ब्रायडन कार्सला विश्वचषक संघात संधी मिळालेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत न खेळलेला विल जॅक्स संघात परतला आहे.
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या जोश टोंगचा (Josh Tongue) पहिल्यांदाच टी20 संघात समावेश करण्यात आला आहे. जेमी ओव्हरटनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंना एकदिवसीय संघात संधी मिळाली आहे.
टॉम बँटननेही एकदिवसीय संघात यशस्वीरित्या स्थान मिळवले आहे. जॅक क्रॉली डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदाच एकदिवसीय संघात परतला आहे. विल जॅक्सलाही एकदिवसीय संघात आपली क्षमता दाखविण्याची संधी देण्यात आली आहे. टी20 विश्वचषक संघासह एकदिवसीय संघात ल्यूक वूडचाही समावेश करण्यात आला आहे. श्रीलंका दौऱ्यात इंग्लंड तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी20 सामने खेळेल.
We have named our provisional squad for the Men’s ICC @T20WorldCup! 🦁
Full story 👇
— England Cricket (@englandcricket) December 30, 2025
एकदिवसीय मालिका 22 जानेवारी रोजी सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 27 जानेवारी रोजी होणार आहे. टी20 मालिका 30 जानेवारी रोजी सुरू होईल, तर अंतिम सामना 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
मोठी बातमी, नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार
इंग्लंडचा टी20 विश्वचषकासाठी तात्पुरता संघ
हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल साल्ट, जोश टंग, ल्यूक वूड
