Fakhar Zaman Record: पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज फखर जमान सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने सलग शतके झळकावली आहेत. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 180 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीसह त्याने आपला सहकारी बाबर आझम आणि वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्स यांना मागे टाकत एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला.
बाबर आझम आणि व्हिव्ह रिचर्ड्सला मागे टाकले
वास्तविक, 180 धावांची इनिंग खेळल्यानंतर फखर जमानने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 3000 धावांचा टप्पा पार केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा फखर तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने बाबर आझम आणि अनुभवी विव्ह रिचर्ड्सला मागे टाकले आहे. या यादीत बाबर आझम चौथ्या क्रमांकावर तर विव्ह रिचर्ड्स पाचव्या क्रमांकावर आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी फखरने 67 डाव घेतले, तर बाबर आझमने 68 डावांमध्ये आणि व्हिव्ह रिचर्ड्सने 69 डावांमध्ये ही कामगिरी केली. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हशिल आमला 57 डावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; जयंत पाटलांना विश्वास
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारे टॉप-5 फलंदाज
हाशिम आमला – 57 डावात.
शाई होप – 67 डावात.
फखर जमान – 67 डावात.
बाबर आझम – 68 डावात.
व्हिव्ह रिचर्ड्स – 69 डावात.
फखर जमानची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
फखर जमानने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 3 कसोटी, 67 एकदिवसीय आणि 76 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने 32 च्या सरासरीने 192 धावा केल्या आहेत आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 10 शतके आणि 15 अर्धशतकाच्या मदतीने 49.70 च्या सरासरीने 3082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 210* धावा आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 128.17 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना फखरने 8 अर्धशतकांच्या मदतीने 1433 धावा केल्या आहेत.