India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या या सामन्यात भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी 8 विकेट्सची गरज होती त्यामुळे हा कसोटी सामना न्यूझीलंड अनिर्णित राखू शकेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मात्र शेवटच्या दिवशी न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शानदार फलंदाजी केली आणि सामना अनिर्णित राखला.
पहिल्या कसोटीच्या (India vs New Zealand) पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारतीय (India) संघाला विजय मिळवण्यासाठी 8 विकेट्सची गरज होती. भारतीय संघ पहिल्या दोन सत्रांतच यजमान संघाचा डाव गुंडाळेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. भारताने पहिल्या सत्रात डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांना बाद करत दोन विकेट्स मिळवलेही, परंतु त्यानंतर डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) आणि ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) यांनी शानदार फलंदाजी केली.
भारतीय गोलंदाजांकडे त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात केवळ 5 विकेट्स गमावून एकूण 239 धावा केल्या. या कसोटीच्या पहिल्या चार दिवसांत खेळल्या गेलेल्या 12 सत्रांपैकी भारताने 8 सत्रांत वर्चस्व गाजवले होते, तर न्यूझीलंडने 4 सत्रांत बाजी मारली होती मात्र, शेवटच्या दिवशी न्यूझीलंडने शानदार पुनरागमन केले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडने (New Zealand) आपल्या पहिल्या डावात हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकांच्या जोरावर 368 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारताने 720 धावांचा डोंगर उभा करत मोठी आघाडी घेतली होती. या डावात के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली, तर इतर चार फलंदाजांनी अर्धशतके नोंदवली. भारताचे लक्ष्य हा सामना एका डावाच्या फरकाने जिंकण्याचे होते.
सत्ता परिवर्तन, हत्येचा कट? आम्ही थांबावलं नाही तर त्याचं…; कैलास पाटलांबाबत शिरसाटांचा गौप्यस्फोट!
🤝 NEW ZEALAND HOLD INDIA TO A DRAW
The first Test between New Zealand and India ends in a draw after a brilliant fightback from Daryl Mitchell and Glenn Phillips. 🇳🇿👏
India failed to take a single wicket in the final 63 overs as the Kiwi duo stood firm to deny them victory.
A remarkable display of resilience from New Zealand 🔥
#NZvsIND #TestCricket #TeamIndia
— The Scoreline (@TheScorelineHQ) November 23, 2026
