Sunil Gavaskar : क्रिकेटमधून कधी निवृत्ती घ्यावी याचा वस्तूपाठ घालून देणारे क्रिकेटर म्हणजे सुनील गावसकर. क्रिकेटच्या मैदानावर सुनील गावसकरांची (Sunil Gavaskar) बॅट कशी तळपायची याचे किस्से जुन्या पिढीला माहिती आहेतच. आजही क्रिकेटच्या मैदानाबाहेर क्रिकेट सामन्यांचे समालोचन आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन अशा अनेक भूमिकांत गावसकर दिसतात. परंतु, क्रिकेटचे मैदान गाजवणारे गावसकर चित्रपटातही झळकले होते. ही गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती नसेल. हाच खास किस्सा सिने अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी लेट्सअप मराठीशी शेअर केला आहे.
६ मार्च १९७१. वेस्टइंडिजच्या भूमीवरील क्रिकेट कसोटी सामन्यात सुनील गावसकर पदार्पण केले. या गोष्टीला ५४ वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे, सुनील गावसकर आणि रुपेरी पडदा यांचाही संबंध आला. मधुमती निर्मित आणि दत्ता केशव दिग्दर्शित “सावली प्रेमाची ” (१९८०) या मराठी चित्रपटात त्यांनी मधुमतीचा रोमॅन्टीक नायक साकारला. रुपेरी प्रेमगीतही साकारले. डॉ. श्रीराम लागू दिग्दर्शित झाकोळ या चित्रपटात क्रिकेटर म्हणून भूमिका साकारली. तर कंवल शर्मा दिग्दर्शित “मालामाल ” या हिंदी चित्रपटात नसिरुद्दीन शहासोबत क्रिकेट खेळतोय अशी भूमिका साकारली.
फॅशन शोबद्दल बोलताना, सरफराजवरुन सुनील गावसकरांची निवड समितीवर टीका
मरीन ड्राईव्हवरील पारशी जिमखान्याच्या मैदानावर याचे शूटिंग झाले तेव्हा आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टींगसाठी सेटवर आमंत्रित करण्यात आले होते. सुनील गावस्करने ‘जीवन म्हणजे क्रिकेट राजा ‘ हे गाणेही गायलंय. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील दिग्दर्शक राहुल रवैलच्या “धर्मयुद्ध” या मालिकेच्या फिल्मी पार्टीत सुनील गावसकरही हजर असल्याचे आठवतय अशा आठवणी ठाकूर यांनी सांगितल्या.