भुवनेश्वर कुमारसमोर जोस बटलर पुन्हा फेल! टी-20 मध्ये नऊवेळा केली शिकार

Bhuvneshwar Kumar-भुवनेश्वरने बटलरला टी-20 क्रिकेटमध्ये 108 चेंडू टाकले आहेत. त्यावर बटलर फक्त 118 धावा करू शकला आहे. त्याची सरासरी 13 आणि स्टाइक रेट अवघा 109 इतकाच आहे.

Rcb And Gt

Rcb And Gt

GT vs RCB: इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) हा टी-20 क्रिकेटमधील धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. 500 हून अधिक सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने 14 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात आठ शतकेही झळकावली आहेत. परंतु भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) समोर बटलर हा नांग्या टाकतोय. टी-20 क्रिकेटमध्ये बुवनेश्वर कुमारने बटलर नऊ वेळा बाद केले आहे. भुवनेश्वरच्या गोलंदाजीचा सामना करताना बटलर हा चाचपडतोय.

भुवनेश्वरने बटलरला टी-20 क्रिकेटमध्ये 108 चेंडू टाकले आहेत. त्यावर बटलर फक्त 118 धावा करू शकला आहे. त्याची सरासरी 13 आणि स्टाइक रेट अवघा 109 इतकाच आहे. त्याला भुवनेश्वरने नऊ वेळा बाद केले आहे.

नऊ वेळांपैकी 5 वेळा भुवनेश्वर कुमारने बटलरला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बाद केले आहे. या फॉरमॅटमध्ये बटलरचा भुवनेश्वरविरुद्ध सरासरी फक्त 8.6 इतकी आहे. टी20 क्रिकेटमध्ये जोस बटलरला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज म्हणूनही भुवनेश्वर कुमार एकमेव आहे. दुसऱ्या क्रमांकावर वरुण चक्रवर्ती आहे. वरुणने बटरला सातवेळा बाद केले आहे.

गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्यात भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजी केलीय. त्याने 4 षटकात 28 धावा देत तीन विकेट घेतल्या आहेत. त्याने बेंगळुरूचे फलंदाज जोस बटलर, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना बाद केले आहे. या हंगामात 9 सामन्यांत त्याच्या खात्यात 17 विकेट्स जमा झाल्या असून त्याच्याकडे सध्या पर्पल कॅपही आहे. मात्र भुवनेश्वरची उत्कृष्ट कामगिरी असूनही आरसीबीला हा सामना 4 विकेट्सने गमवावा लागला.

Exit mobile version