Download App

Happy Birthday Sachin : राज ठाकरेंनी दिल्या सचिनला हटके शुभेच्छा, असाच…

  • Written By: Last Updated:

Happy Birthday Sachin : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत असे अनेक विक्रम केले, जे येत्या काही वर्षांत मोडणे अशक्य वाटते. 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत जन्मलेल्या सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन तेंडुलकरला राजकीय क्षेत्रासह देशातील सर्वच मोठं – मोठ्या लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सचिनला दिलेल्या शुभेच्छाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. राज ठाकरे यांनी सचिन सोबतचा फोटो शेयर सचिनला मित्र म्हणत त्याचे खूप सारे कौतुक केले आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत सचिनलाल वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे आपल्या शुभेच्छामध्ये म्हणतात सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. ह्या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची किंवा एकत्र आख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. सचिनने शतक ठोकलंच पाहिजे अशी कायमच इच्छा किंवा अपेक्षा असते, ही इच्छा/अपेक्षा @sachin_rt तू पूर्ण करशीलच.

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 आणि कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्व फॉरमॅटमध्ये 100 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सचिनने त्याच्या कारकिर्दीतील एकमेव आंतरराष्ट्रीय टी-20 सामना 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. सचिन तेंडुलकरने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, मात्र निवृत्तीपूर्वी त्याने असे अनेक विक्रम केले, जे मोडणे कठीण आहे.

 

Tags

follow us