Hardik Pandya in love again after divorce! Shared a photo with his new girlfriend on his birthday : भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा त्याच्या खेळाबरोबरच वैयक्तिक आयुष्यासाठी देखील तेवढाच चर्चेत असतो. गेल्यावेळी त्याच्या घटस्फोटांच्या चर्चेंने तो माध्यमांमध्ये झळकत होता. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या त्याच्या दुसऱ्या नात्याच्या अफवां सुरू होत्या. त्यानंतर आता पांड्याने 11 ऑक्टोबर म्हणजे आजच्या त्याच्या 32 व्या वाढदिवसानिमित्त नव्या नात्याबद्दल इंस्टाग्रामच्या स्टोरीमधून अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
फडणवीस सरकारला वठणीवर आणणारच! हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश…
या अगोदर हार्दिक पांड्याचा विवाह नताशा स्टॅनकोविच तिच्यासोबत झाला होता. काही वर्ष राहिलेल्या या नात्यांमध्ये त्यांना एक मुलगा देखील आहे. त्यानंतर मात्र त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा पांड्याने त्याच्या नव्या राज्याची घोषणा केली आहे. हार्दिक पांड्या हा त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी समुद्रकिनारी भटकंती करतो यामध्येच 10 ऑक्टोबर रोजी त्याने त्याचा इंस्टाग्राम स्टोरीवर समुद्रकिनारी माहिका शर्मा यांच्या नव्या गर्लफ्रेंड सोबतचे खास फोटो शेअर केले. हे फोटो ज्या पोज मध्ये शेअर करण्यात आले आहेत. त्यावरून त्यांनी त्याचं नवनाथ जाहीर केला आहे.
कोण आहे माहिका शर्मा?
माहिका शर्मा ही हार्दिक वरून सात वर्षांनी लहान आहे. भारतीय फॅशन जगामध्ये ती प्रसिद्ध आहे. तिने एले आणि ग्राझिया यासारख्या प्रसिद्ध मॅक्झिनच्या कव्हर पेजसाठी मॉडलिंग केलं आहे. इंडिया फॅशन अवॉर्ड्समध्ये मॉडल ऑफ द इयर हा किताब तिने जिंकला आहे. त्याचबरोबर तिने अनेक प्रीमियम ब्रँड्स ज्यामध्ये तनिष्क, विवो आणि युनिक्लो यांच्या जाहिरातींमध्ये मॉडलिंग केले. त्याचबरोबर ती नेहमीच तरुण तहिलानिया, मनीष मल्होत्रा आणि अनिता डोंगरे यासारख्या प्रसिद्ध डिझायनरच्या साठी मॉडलिंग करते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि मालिकाच्या नात्याबद्दल चर्चा सुरू होते त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं मात्र आता हार्दिकच्या पोस्टानंतर एक प्रकारे त्यांच्या नात्याला शिक्कामोर्तब केलेले आहे.