Download App

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा ‘चॅम्पियन’सारखा विजय; भारताची फलंदाजी, गोलंदाजी अखेरच्या सामन्यात ढेपाळली

जवळपास दीड महिन्यांपासून सुरु झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा (Cricket World Cup 2023) अंतिम सामना (World Cup Final) आज (19 नोव्हेंबर) दुपारी दोनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांसह संपूर्ण जगातील चाहते या सामन्यांकडे डोळे लावून बसले आहेत. विशेष म्हणजे या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स उपस्थित राहणार आहेत. (ICC Cricket World Cup 2023 final match India vs Australia live update live cricket score)

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Nov 2023 08:58 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 195/3

    36 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा आहे. ट्रॅव्हिस हेड 102 चेंडूत 109 धावांवर खेळत आहे. तर मार्नस लॅबुशेन 87 चेंडूत 42 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 148 धावांची भागीदारी आहे. ऑस्ट्रेलियाला आता विजयासाठी 84 चेंडूत फक्त 46 धावा करायच्या आहेत.

  • 19 Nov 2023 08:20 PM (IST)

    हेड आणि लॅबुशेन यांच्यातील शतकी भागीदारी

    ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात 121 चेंडूत 101 धावांची भागीदारी आहे. 27 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा आहे.

  • 19 Nov 2023 07:18 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाचा स्कोर 51-3

    9 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा आहे. शमी आणि बुमराहसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज हतबल दिसत आहेत. जसप्रीत बुमराहने स्टीव्ह स्मिथला बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला.

  • 19 Nov 2023 06:35 PM (IST)

    मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, वॉर्नर आऊट

    ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट दुसऱ्या षटकात 16 धावांवर पडली. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला स्लिपमध्ये झेलबाद केले. वॉर्नरला तीन चेंडूत केवळ सात धावा करता आल्या.

    जसप्रीत बुमराहने पहिले षटक टाकले. या षटकात तीन चौकारांसह एकूण 15 धावा काढल्या. हेडने दोन चौकार मारले तर वॉर्नरने एक चौकार मारला.

  • 19 Nov 2023 05:58 PM (IST)

    ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य

    IND vs AUS Final: विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय संघासाठी आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 240 धावांवर केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. विराट कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रोलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान दिले आहे.

  • 19 Nov 2023 05:37 PM (IST)

    भारताची आठवी विकेट पडली

    टीम इंडियाने 45 व्या षटकात 214 धावांवर आठवी विकेट गमावली आहे. अॅडम झाम्पाने जसप्रीत बुमराहला एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला आठवा धक्का दिला.

    भारताची सातवी विकेट मोहम्मद शमीच्या रुपात पडली
    भारताने 44 व्या षटकात 211 धावांवर सातवा विकेट गमावला आहे. मोहम्मद शमी 10 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सहा धावा करून बाद झाला. 44 षटकांनंतर भारताची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 213 धावा आहे. आता सूर्यकुमार यादव ही शेवटची आशा आहे.

  • 19 Nov 2023 05:17 PM (IST)

    भारताची सहावी विकेट पडली

    भारताने 42 व्या षटकात 203 धावांवर सहावी विकेट गमावली आहे. केएल राहुल 107 चेंडूत 66 धावा करून बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने विकेटच्या मागे झेलबाद केले. 42 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 6 विकेटवर 207 धावा आहे.

  • 19 Nov 2023 04:50 PM (IST)

    भारताची पाचवी विकेट पडली, रवींद्र जडेजा बाद

    केवळ 178 धावांवर भारतीय संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. जोश हेझलवूडने 36व्या षटकात भारताला पाचवा धक्का दिला. त्याने रवींद्र जडेजाला विकेटच्या मागे झेलबाद केले. 22 चेंडूत 9 धावा करून जडेजा बाद झाला. आता केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत.

  • 19 Nov 2023 04:12 PM (IST)

    नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सन्नाटा, विराट कोहली आऊट

    टीम इंडियाला 29व्या षटकात 148 धावांवर मोठा धक्का बसला. विराट कोहली 63 चेंडूत 54 धावा करून बाद झाला. विराटला पॅट कमिन्सने बोल्ड केले. आता भारताची टीम अडचणीत आली आहे. रविंद्र जडेजा मैदाना आला आहे. केएल राहुलने 71 चेंडूत 39 धावा केल्या आहेत.

  • 19 Nov 2023 04:01 PM (IST)

    विराट कोहलीने अर्धशतक झळकावले

    सेमीफायनल आणि फायनलमध्ये 50 हून अधिक धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अंतिम सामन्यात किंग कोहलीने 56 चेंडूत अर्धशतक झळकावले. यापूर्वी त्याने उपांत्य फेरीत शतक झळकावले होते. कोहलीने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष केला.

    27.5 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन विकेटवर 144 धावा आहे. केएल राहुल 66 चेंडूत 36 तर विराट कोहली 60 चेंडूत 52 धावांवर खेळत आहे.

Tags

follow us