ODI World Cup Tournament Prize Money : एकदिवसीय विश्वचषकाविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारत एकट्याने या मोठ्या स्पर्धेचं यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान, होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आता आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील सर्व संघांसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली. ICC अंदाजे 83 कोटी रुपये (US$10 दशलक्ष) बक्षीस रक्कम वितरीत करेल.
यापैकी, विजेत्याला अंदाजे रु. 33 कोटी (US$4 दशलक्ष), तर उपविजेत्याला अंदाजे रु. 17 कोटी (US$2 मिलियन) मिळतील. याचा अर्थ विजेत्या संघासोबत अतिम फेरीत हरणाऱ्या संघाला देखील बक्षीसाचाी तगडी रक्कम मिळणार आहे. परिषदेने विविध फेऱ्यांसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे.
https://x.com/mufaddal_vohra/status/1705177629660209305?s=20
उपविजेता आणि उपविजेत्या संघांव्यतिरिक्त, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला सुमारे 6 कोटी रुपये आणि गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघाला सुमारे 82 लाख रुपये मिळतील. यावेळी जाहीर करण्यात आलेली बक्षीस रक्कम गेल्या हंगामाप्रमाणेच आहे. परिषदेने पूर्वीच्या सुमारे ८३ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या मोसमातील चॅम्पियन इंग्लंडला सुमारे 33 कोटी रुपये मानधन मिळाले होते.
T20 विश्वचषक विजेत्याला 13 कोटी रुपये
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या T-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाला 13 कोटी 5 लाख 35 हजार रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या पाकिस्तानी संघाला 6 कोटी 52 लाख 64 हजार रुपये मिळाले होते.
5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जर्सी लॉंन्च केली. जर्सीच्या बाजूना प्रसिध्द डिझायनर आंटी फिओन क्लार्क यांनी डिजाईन केलेली फर्स्ट नेशन्स आर्टवर्क आहे. ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकात पिवळ्या जर्सीत उतरणार आहे. जर्सीत कोणतेही महत्वपूर्ण बदल केले नाहीत.
एकदिवसीय विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 46 दिवस चालेल, ज्यामध्ये 48 सामने खेळले जातील. फर्स्ट सामना हा 5 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना मागील विश्वचषक विजेते आणि उपविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
14 तारखेला भारत-पाकिस्तान सामना
टीम इंडियाचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. कोट्यवधी क्रिकेटप्रेमी ज्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.