IND vs AUS : विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी 20 सामन्यांची मालिका (IND vs AUS) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आज सायंकाळी 7 वाजल्यापासून दुसरा सामना सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात (Team India) नवीन चेहरे दिसत आहे. दुसरा सामना जिंकून आघाडीत वाढ करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. मात्र या सामन्याआधीच सामना संकटात सापडला आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. तिरुवनंतपुरम येथे काही दिवसांपासून सुरू आहे. रविवारीही पाऊस होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे सामना होईल की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. सामना सायंकाळी सुरू होणार आहे, त्यामुळे सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार नाही, असेही सांगितले जात आहे.
IND vs PAK : वर्ल्डकपनंतर पुन्हा भारत-पाक भिडणार; ‘या’ दिवशी होणार हायहोल्टेज सामना
या सामन्याआधी हवामानाबद्दल महत्वाची अपडेट मिळाली. सामन्याच्या एक दिवस आधी शनिवारी येथे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मैदानात सगळीकडेच पाणी साचले होते. त्यानंतर आजही पावसाची शक्यता दिसत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दुपारपर्यंत पावसाची शक्यता 55 टक्के आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. परंतु,सायंकाळी हवामान स्वच्छ राहिले अशीही शक्यता आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार नाही असे सांगितले जात आहे. परंतु, सध्याच्या पावसाची परिस्थिती पाहता पुढील 24 तासात हवामान खराब राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आघाडीच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार
याआधी भारतीय संघाने विशाखापट्टणम T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 विकेटने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 19.5 षटकांत 209 धावा करत सामना जिंकला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत सर्वाधिक 80 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. या शानदार खेळीसाठी टीम इंडियाच्या कर्णधाराला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
तिरुअनंतपुरममध्ये भारत कांगारुंशी भिडणार, जाणून घ्या पिच रिपोर्ट..
तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. म्हणजेच फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे नाही. या खेळपट्टीवर कमी धावसंख्येचे सामने झाले आहेत. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांना गोलंदाजांसमोर धावा काढण्यासाठी झगडावे लागत आहे. या मैदानावर टी-20 फॉरमॅटमध्ये सरासरी केवळ 114 धावा आहेत. आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय सामने या मैदानावर खेळले गेले आहेत.