WTC 2023 Final : अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. ओव्हलच्या मैदानावर जिथे रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांसारखे फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब फ्लॉप झाले, त्याच आक्रमणासमोर रहाणे भिंत बनला आणि अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने 92 चेंडूत अर्धशतक ठोकले. 129 बॉल्समध्ये 89 धावा करुन तो बाद झाला आहे. दुसऱ्या सेशननंतर खेळ सुरु होताना तो बाद झाला. कमिंसने त्याची विकेट घेतली आहे.
रहाणे 18 महिन्यांनंतर कसोटी सामना खेळत आहे. तब्बल 18 महिन्यांनंतर त्याने पुनरागमन केले असून त्याने नावाला साजेशी खेळी केली आहे. रहाणेने पॅट कमिन्सच्या चेंडूवर षटकार ठोकत आपल्या 50 धावा पूर्ण केल्या. यासह, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच या खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
5️⃣0️⃣ and going strong!
Ajinkya Rahane reaches his half-century with a maximum 👏🏻👏🏻
Follow the match ▶️ https://t.co/0nYl21pwaw#TeamIndia | #WTC23 | @ajinkyarahane88 pic.twitter.com/LBIt6lx01p
— BCCI (@BCCI) June 9, 2023
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताने 71 धावांवर 4 विकेट गमावल्या असताना रहाणे भारतासाठी भिंत बनून उभा राहिला. गिल, रोहित, कोहली, पुजारा यापैकी कोणीही 15 धावांपर्यंत मजल मारू शकले नाही. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियासमोर भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाली. अशा परिस्थितीत रहाणेने ही कामगिरी केली आहे.
Champions Trophy 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाणार
या कठीण परिस्थितीत रहाणे मैदानात उतरला. तो 11 जानेवारी 2022 नंतर पहिला कसोटी सामना खेळत आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. जिथे तो दोन्ही डावात फ्लॉप ठरला होता. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते.
रहाणेने अत्यंत सावधपणे फलंदाजी केली. प्रथम त्याने रवींद्र जडेजासोबत 71 धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने शार्दुल ठाकूरसोबतही चांगली भागीदारी केली. रहाणे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येही त्याने आपला फॉर्म दाखवला. त्यांनी संपूर्ण देशाच्या आशा उंचावल्या आहेत.